Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये विक्की कौशलची स्पेशल एन्ट्री, ‘छावा’ चित्रपटाचं थेट मराठी मालिकेत दमदार प्रमोशन

स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत सध्या श्री आणि सौ स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता असतानाच जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 08, 2025 | 03:28 PM
'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये विक्की कौशलची स्पेशल एन्ट्री, 'छावा' चित्रपटाचं थेट मराठी मालिकेत दमदार प्रमोशन

'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये विक्की कौशलची स्पेशल एन्ट्री, 'छावा' चित्रपटाचं थेट मराठी मालिकेत दमदार प्रमोशन

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत सध्या श्री आणि सौ स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता असतानाच जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे. हा खास पाहुणा म्हणजे सुप्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता विक्की कौशल. विक्की कौशलचा ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चाहते चित्रपटासाठी कमालीचे उत्सुक आहेत. प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून चित्रपटाच्या दिग्दर्शकांसह चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

‘मिसेस मुख्यमंत्र्यांचं’ नवं गाणं रिलीज, अमृता फडणवीस यांच्या ‘मारो देव बापू सेवालाल’ गाण्याला नेटकऱ्यांकडून पसंदी

आता अशातच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलने ‘घरोघरी मातीच्या चुली’च्या सेटवर खास हजेरी लावली आहे. सध्या मालिकेत श्री आणि सौ स्पर्धा अटीतटीची होतेय. जानकी आणि ऋषिकेश अतिशय जिद्दीने ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जानकी- ऋषिकेशला प्रोत्साहन देण्यासाठी विक्की यांनी खास टिप्स दिल्या. खेळ असो नाहीतर लढाई… हिंमत कधी हरायची नाही. खेळ जर जिंकायचाच असेल तर गनिमी काव्याने सुद्धा जिंकता येतो. लढाई आपल्या माणसांच्या भरोशावर लढायची असते. आपल्या टीमला सोबत घेऊन लढायची असते. आणि जगात नवरा बायको पेक्षा भारी टीम दुसरी कुठलीच नसते. तेव्हा जिद्दीने लढा द्या असा कानमंत्र देत विक्की यांनी जानकी-ऋषिकेशला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत छावा सिनेमा पहाण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

 

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन, वेगवेगळ्या भाषांतील नाटकांचा मिळणार आस्वाद

जानकी-ऋषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे विक्कीसोबतचा शूटिंगचा दिवस कायम स्मरणात ठेवतील. सुरुवातीला विक्की यांच्यासोबत काम करण्याचं दडपण होतं. मात्र त्यांनी येताक्षणीच हे दडपण दूर केलं. खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. मराठी भाषेवर त्यांचं विशेष प्रेम आहे. मालिकेतला सीन मराठीमध्ये असल्यामुळे त्यांनी शूटिंग सुरु होण्यापूर्वी संपूर्ण टीमशी संवाद साधला. मालिकांचं शूट नेमकं कसं होतं, उच्चार कसे असायला हवे अश्या बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. आम्हा सर्वांसाठीच ही फॅन मोमेण्ट होती अशी भावना रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांनी व्यक्त केली.

विक्की कौशलसोबतचा हा खास भाग पाहायचा असेल तर नक्की पाहा घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर आणि 14 फेब्रुवारीपासून छावा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

Web Title: Vicky kaushal chhaava movie actor to seen in gharoghari matichya chuli star pravah serial to promote serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 03:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.