फोटो सौजन्य: अमृता फडणवीस इन्स्टाग्राम
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात असतात. अमृता फडणवीस या उत्तम गायिका असून त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. कायमच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या अमृता यांचं काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर एक नवं गाणं रिलीज झालं आहे. त्या गाण्याचं नाव, ‘मारो देव बापू सेवालाल’ असं आहे. त्यांनी गायलेल्या मराठी गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून चाहत्यांकडून गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टी-सीरिजच्या बॅनरखाली ‘मारो देव बापू सेवालाल’ हे नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत यु-ट्युब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं ‘मारो देव बापू सेवालाल’ (Maro Dev Bapu Sevalal Song) रिलीज केलं आहे. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने हे गाणं रिलीज होणार असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले. “#मी पुन्हा येत आहे… आपली संस्कृती आणि धरोहर तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने एक गीत घेऊन येत आहे. संपर्कात रहा.” असं कॅप्शन देत त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली.
दरम्यान, येत्या १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्ताने हे गाणं लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचं हे नवं कोरं गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अमृता फडणवीस यांच्या ‘मारो देव बापू सेवालाल’ या गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहेत, तर याचं संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अमृता फडणवीस बंजारा लूकमध्ये दिसत आहेत. या गाण्यात अमृता फडणवीस बंजारा पोशाखात पाहायला मिळत आहे. टी-सीरीजच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘पाताल लोक’च्या हाथीराम चौधरीला अभिनेता नाही तर आर्मी ऑफिसर व्हायचं होतं, खरं कारण जाणून घ्या
अमृता फडणवीस बँकर असण्यासोबतच गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. अमृता फडणवीस कायमच आपली कला जपताना पाहायला मिळतात. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे इन्स्टाग्राम 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमृता फडणवीस यांनी अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. सध्या अमृता फडणवीस यांच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.