Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शंभूराजेंचा बलिदान दिवसानिमित्त अभिनेता विकी कौशलची स्पेशल पोस्ट; म्हणाला, “ ‘छावा’मध्ये साकारलेली भूमिका…”

संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्याचं कारण म्हणजे, आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी...

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 11, 2025 | 06:01 PM
शंभूराजेंचा बलिदान दिवसानिमित्त अभिनेता विकी कौशलची स्पेशल पोस्ट; म्हणाला, “ 'छावा'मध्ये साकारलेली भूमिका…”

शंभूराजेंचा बलिदान दिवसानिमित्त अभिनेता विकी कौशलची स्पेशल पोस्ट; म्हणाला, “ 'छावा'मध्ये साकारलेली भूमिका…”

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता विकी कौशल ‘छावा’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याने चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्याचं कारण म्हणजे, आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी… ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. आज शंभूराजांच्या हौतात्म्याला ३३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त ‘छावा’फेम अभिनेता विकी कौशलने पोस्ट शेअर करत महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“जीव गुदमरत होता, गाडी कशीबशी…”, मराठी अभिनेत्यानं शेअर केला शिवशाही बसमधल्या ‘त्या’ धक्कादायक प्रवासाचा अनुभव

अभिनेत्याने काही तासांपूर्वीच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. महाराजांबद्दल शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले की, “११ मार्च १६८९ म्हणजे, शंभु राजे बलिदान दिवस… आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त मी त्या योद्ध्याला वंदन करतो, ज्यांनी शरणागतीपेक्षा मृत्यूची निवड केली. ते अकल्पनीय छळाला तोंड देत उभा राहिले आणि ते शेवटपर्यंत जगासाठी धैर्याने लढत राहिले. कलाकाराने साकारलेल्या काही निवडक भूमिका कायमच त्याच्याबरोबर राहतात आणि मी ही एक कलाकार म्हणून ‘छावा’ चित्रपटात साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही त्यापैकी एक आहे. त्यांचा जीवनप्रवास हा केवळ इतिहास नाहीये, ती गोष्ट धैर्य आणि त्यागाची आहे… जी अजूनही लाखो लोकांना प्रेरणा देते. जिंदा रहे! जय भवानी, जय शिवाजी! जय शंभूराजे!” असं म्हणत विकीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

दरम्यान, विकी कौशलने या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. अभिनेत्याने महाराजांच्या भूमिकेसाठी जवळपास ७ ते ८ महिने मेहनत घेतली आहे. तर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चित्रपटाच्या कथानकावर तब्बल ४ वर्षे काम केले आहे. अभिनेत्यासह संपूर्ण चित्रपटाच्या टीमला ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांवर सखोल अभ्यास करता आला, असं सर्वांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. विकी कौशलच्या सिनेकरियरमधील सर्वाधिक हिट चित्रपटाच्या यादीमध्ये अग्रगण्य असलेला हा चित्रपट १४ फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. चित्रपटाने आजवर कोट्यवधींची कमाई केलेली आहे.

“कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही चित्रपटांचे तिकीटदर २०० रुपये करावे”,प्रसिद्ध अभिनेत्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं आहे. २०२५ मध्ये ५०० कोटी कमावणारा ‘छावा’हा पहिला चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ चित्रपटाने देशामध्ये ६२०. ३ कोटींची घसघशीत कमाई केलेली आहे. तर जगभरात चित्रपटाने ७०० कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. चित्रपटाची ही संपूर्ण कमाई २५ दिवसांची आहे. चित्रपटामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, डायना पेंटी, दिव्या दत्ता, प्रदीप रावत, संतोष जुवेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Web Title: Vicky kaushal pays tribute to chhatrapati sambhaji maharaj with unseen chhaava pic some roles stay with

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • Bollywood
  • Chhaava Movie
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
1

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित
2

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!
3

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा
4

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.