Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेक्षकांच्या अफलातून प्रतिसादानंतर विकी कौशलची पहिली पोस्ट! म्हणाला, “छावा तुम्ही खऱ्या अर्थाने जिवंत…”

‘छावा’चित्रपटाच्या माध्यमातून शिवप्रेमींना रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा पाहायला मिळाली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून अफलातून प्रतिसाद मिळाल्यानंतर खास अभिनेत्याने स्पेशल इन्स्टा पोस्ट शेअर केलीये.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 15, 2025 | 03:06 PM
दहाव्या दिवशीही 'छावा'चाच बोलबाला! कमाईत पार केला 300 कोटींचा टप्पा; एकूण कलेक्शन किती?

दहाव्या दिवशीही 'छावा'चाच बोलबाला! कमाईत पार केला 300 कोटींचा टप्पा; एकूण कलेक्शन किती?

Follow Us
Close
Follow Us:

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता विकी कौशल आहे. अभिनेत्याचा बहुप्रतीक्षित ‘छावा’चित्रपट ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘छावा’चित्रपटाच्या माध्यमातून शिवप्रेमींना रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा पाहायला मिळाली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून अफलातून प्रतिसाद मिळाल्यानंतर खास अभिनेत्याने स्पेशल पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Chhaava Box Office Collection: विकी कौशलच्या ‘छावा’ने पहिल्याच दिवशी तोडले 6 रेकॉर्ड्स, बॉक्स ऑफिसवर बंपर सुरूवात

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून अफलातून प्रतिसाद मिळाला आहे. ‘छावा’चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहायला मिळत आहे. शंभूराजेंच्या इतिहास असलेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३३.१ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची सध्याची बॉक्स ऑफिस कमाई पाहता चित्रपट येत्या काही दिवसांत कलेक्शनमध्ये इतिहास रचणार असा अंदाज अनेक चित्रपट समीक्षकांनी मांडला आहे. अभिनेत्याने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘छावा’ला मिळणारं भरभरून प्रेम पाहून विकीने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

काही तासांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये विकी म्हणतो की, “तुमच्या प्रेमाने ‘छावा’ चित्रपट आज खऱ्या अर्थाने जिवंत झाला. तुम्ही केलेले मेसेजेस, फोन, व्हिडीओ आणि चित्रपट पाहताना तुम्हाला आलेले अनुभव या सगळ्या गोष्टी पाहून मी भारावून गेलो आहे. मी सगळं काही पाहतोय… आणि चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि भरभरुन मिळणारे प्रेम पाहून प्रचंड सुखावलो आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मन:पूर्वक आभार… छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची शौर्यगाथा थिएटरमध्ये जाऊन अनुभवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार… (विश्वास आपका साथ हो, तो युद्ध लगे त्योहार!) जर विश्वास तुमच्यासोबत असेल तर, युद्धही एखाद्या उत्सवासारखे वाटते…”

ऑस्करवारी करणारा ‘लगान’ ते काळजाला भिडणारा ‘स्वदेस’, मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘या’ ५ चित्रपटांच्या प्रेमात प्रेक्षक

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा विकी कौशलच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट आहे, ज्याने पहिल्या दिवशी १० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. १३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा पहिल्या सोमवारपर्यंत १०० कोटींच्या क्लबमध्ये सहज प्रवेश करण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे प्रदर्शनापूर्वीच १३.७९ कोटी रुपयांचे मोठे अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले होते. Sacnilk च्या अहवालानुसार, शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी ‘छावा’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३३.१ कोटींचे शानदार निव्वळ कलेक्शन केले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच ‘छावा’च्या शो साठी चांगली गर्दी दिसून आली. हा चित्रपट देशभरातील ३५०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.

Web Title: Vicky kaushal reacts as chhaava becomes his biggest opener as leading man so grateful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 03:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.