बॉलिवूडची ‘दबंग’ गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज विवाहबंधनात अडकणार आहे. आज सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार आहेत. नंतर संध्याकाळी एक खास पार्टी ते देणार आहेत. त्यांच्या लग्नावर दोन्ही कुटुंबाकडून बऱ्याच प्रतिक्रिया समोर आल्या असून, या नव्या जोडप्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाक्षी आणि जहीर हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मेहंदी आणि इतर वेडिंग फंक्शन्सनंतर हे जोडपं आज, रजिस्टर मॅरेज कराणार असल्याचे जहीरचे वडील राजा झहीर यांनी सांगितले.
सोनाक्षी धर्म न बदलता झहीर इक्बालशी कायदेशीर विवाह करणार आहे. या दोघांच्या लग्नाला संपूर्ण कुटुंबासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी, त्यांची मित्र-मंडळीदेखील त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार आहेत. प्रत्येक मुलीसाठी तिचा लग्नाचा ड्रेस खूप खास असतो, सगळ्यांच्या लक्ष तिच्या लुककडे असते. पण अशातच सोनाक्षीच्या लग्नाआधीच त्याच्या आउटफिट्सचा खुलासा सर्वांसमोर झाला आहे. सोशल मिडीयावर दोघांच्या आउटफिट्सचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
या व्हिडीओत सोनाक्षीच्या घराबाहेर काही लोक कारमधून आउटफिट्स काढताना दिसत असुन, त्यात पीच रंगाचा एक लेहंगा दिसत आहे. तो सोनाक्षीच्या लग्नाचा आउटफिट असल्या चर्चा सर्वत्र चालु आहे. सोनाक्षीचा लग्नाचा जोडा लाल रंगाचा नाही तर पीच कलरचा असणार आसल्याची चर्चा होत आहे. इतकेच नाही तर सोनाक्षी आणि जहीरच्या प्रीवेडींगचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. लग्नानंतरच्या सोनाक्षी-जहीर, या जोडप्याचा पहिला फोटो, पहिली झलक पाहण्यासाठी सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत.