Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुखापतीतून बरा होऊन विजय देवरकोंडा पोहचला ‘किंगडम’च्या शुटिंगला, चित्रपटाची नवीन अपडेट आली समोर

अभिनेता विजय देवरकोंडाच्या 'किंगडम' चित्रपटाचा काही भाग अजूनही शुटिंगचा बाकी असून अभिनेता खांद्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे आणि आता तो शुटिंगला परतला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 15, 2025 | 07:36 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा कमालीचा चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्याच्या ‘किंगडम’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या शुटिंगही सध्या सुरु आहे. चित्रपटाचा काही भाग अजूनही शुटिंगचा बाकी असून अभिनेता खांद्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे आणि आता तो शुटिंगला परतला आहे. विजय देवरकोंडाच्या ‘किंगडम’ चित्रपटाची शुटिंग सध्या विशाखापट्टणम येथे सुरु आहे.

Baipan Bhari Deva Re Release: महिला दिनाच्या निमित्ताने “बाईपण भारी देवा” पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अलिकडेच अभिनेत्याच्या खांद्याला शुटिंग दरम्यान दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून अभिनेता आता सावरला असून त्याने आपल्या चित्रपटाच्या उरलेल्या शुटिंगला आजपासून सुरुवात केलेली आहे. २०२३ मध्ये ‘किंगडम’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी आहेत. ‘किंगडम’ मध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन, दमदार कथा आणि विजयचा उत्तम अभिनय पाहायला मिळेल. विजय ‘किंगडम’ च्या सेटवर जखमी झाला होता. अभिनेत्याच्या टीमच्या मते, खांद्याच्या दुखापतीनंतरही विजयने शूटिंग सुरू ठेवले कारण त्याच्याकडे विश्रांती घेण्यासाठी वेळ नव्हता.

मराठी संगीत विश्वात पहिल्यांदाच कवितेतून साकारलं गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरलं!

चित्रपटाच्या निर्मितीसंबंधित एका विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात अ‍ॅक्शनसोबतच भावनाही आहेत. त्यातील ८० टक्के चित्रीकरण झाले आहे. २० टक्के भाग लवकरच पूर्ण होईल. चित्रपटाच्या उर्वरित भागाचे चित्रीकरण पुढील काही आठवड्यात जलद गतीने करण्याचा निर्णय टीमने घेतला आहे. ‘किंगडम’ चित्रपट ३० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बहुप्रतिक्षित ‘किंगडम’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये विजय देवरकोंडाचा शक्तिशाली अवतार बघायला मिळाला. टीझरच्या सुरुवातीला, चित्रपटाची कथा एका आवाजाद्वारे सांगितली जात आहे. ज्यामध्ये युद्धाबद्दल बोलले जात आहे. यामध्ये अभिनेता अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

साध्या सोज्वळ प्राजक्ता माळीची आगामी चित्रपटात हटके भूमिका, चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल

चित्रपटाचा टीझर १ मिनिट ५५ सेकंदांचा आहे. या चित्रपटाची कथा लोकांचे रक्षण आणि बचाव करण्यासाठीच्या युद्धाभोवती फिरत आहे. टीझरमध्ये विजय देवरकोंडाचा लूक देखील खूपच खतरनाक दिसत आहे. चित्रपटाचा टीझर सितारा एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. टीझरमध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने हिंदी टीझरसाठी त्याचा खास आवाज दिला आहे.

Web Title: Vijay deverakonda reaching to vishakapattanam to comple kingdom shooting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 07:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.