vishal nikam and disha pardeshi
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता असलेल्या अभिनेता विशाल निकमच्या (Vishal Nikam) मनात सध्या कुणीतरी घर केलंय… त्याच्या मनातील ती व्यक्ती कोण हे लवकरच समोर येणार आहे. ‘तू संग मेरे’ (Tu Sang Mere) असं म्हणत त्याने आपल्या प्रेमाची खुलेआम कबुली दिली आहे. व्हिडिओ पॅलेसची (Video Palace) निर्मिती असलेल्या ‘तू संग मेरे’ या हिंदी रोमँटिक अल्बममध्ये अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री दिशा परदेशी (Disha Pardeshi) झळकणार आहे. व्हिडिओ पॅलेसने सोशल मीडियावर याविषयी घोषणा केली आहे.
[read_also content=”‘या’ दिवशी प्रेक्षकांना पाहता येणार फक्त मराठी सिने सन्मान सोहळा https://www.navarashtra.com/entertainment/fakt-marathi-cine-sanman-award-function-on-fakt-marathi-on-21st-august-nrsr-318006/”]
‘तू संग मेरे रंग भरे… कहने दे जो दिल ये कहे…
हाथ ये तेरा हाथ में… मेरे साथ ये ऐसा रहे…
असे बोल असलेल्या या गीतातून त्याची दिशा सोबतची ‘प्यारवाली’ केमिस्ट्री दिसणार आहे. रोहितराज कांबळे याने लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे याने स्वरबद्ध केले आहे. काश्मीरच्या सुंदर लोकेशन्सवर चित्रीत झालेल्या या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकरने केले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे.
आपल्या पहिल्या हिंदी अल्बमविषयी विशाल सांगतो,“या हिंदी गाण्यासाठी व्हिडीओ पॅलेसने मला दिलेली ही संधी खूप महत्त्वाची आहे.” अभिनेत्री दिशा परदेशी सांगते की, “वेगळा अनुभव याशूट दरम्यान मी घेतला. आमची लव्हेबल जोडी आणि हे रोमँटिक गाणं सर्वांना नक्कीच आवडेल.”