फोटो सौजन्य - Pinterest
बॉलीवूडमध्ये काही असे चित्रपट बनले आहेत ज्यात लोकं सिनेमाच्या हिरोपेक्षा सिनेमाच्या खलनायकाच्या पात्राचे चाहते झाले आहेत. मुळात, हा इतिहास आहे की ज्या-ज्या सिनेमांच्या खलनायकाची भूमिका नायकाच्या भूमिकेपेक्षा जास्त प्रसिद्धीस आली, तो चित्रपट सुपरहिट ठरला आहे. मग तो शोले असुदे किंवा मोगॅम्बोचा मिस्टर इंडिया! जिथे खलनायक हिट तो मूवी हिट, असे सूत्र सुरवातीपासूनच पाहायला मिळत आहेत. हे सगळे झाले जुने चित्रपट पण नव्या चित्रपटातील खलनायकांनीही यात काही कसर ठेवली नाही आहे.
काही चित्रपटांमध्ये तर इतर चित्रपटांमध्ये नायकांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांनीदेखील खलनायकाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. इतकेच नव्हे तर त्या अभिनेत्यांचे नव्याने नवा चाहतावर्ग देखील तयार झालेला दिसून आला आहे. चित्रपटात नायकाची भूमिका जितकी महत्वाची असते तितकीच खलनायकाची असते कारण चित्रपटात खलनायकच नसेल तर चित्रपटाच्या गोष्टीला काही अर्थ उरात नाही. चला जाणून घेऊया बॉलीवूडमधील अशा अभिनेत्यानंबद्दल ज्यांनी त्यांच्या अभिनयाने त्यांचे खलनायकाचे पात्र अजरामर केले आहे.
बॉबी देओल
नव्वदच्या दशकात हिरो म्हणून सिनेजगात पाऊल ठेवलेला अभिनेते धर्मेंद्र यांचे सुपुत्र बॉबी, हिरोच्या भूमिकेत जास्त टिकू शकला नाही. पण गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ऍनिमल या चित्रपटातील अबरारच्या भूमिकेला बॉबीने त्याच्या अभिनयाने चार चांद लावले. इतकेच नव्हे तर त्याने चित्रपटात फक्त १५ मिनिटाचा सीन देऊन हिरोपेक्षा मोठा चाहतावर्ग तयार केला.
रणवीर सिंग
रणवीर सिंग त्याच्या अभिनयामुळे तसेच बिंधास्तपणामुळे प्रसिद्ध आहे. रणवीरने केलेली पद्मावत मधील अल्लाहुद्दिन खिलजीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. लोकांचे म्हणणे होते की त्याच्यासारखी अल्लाहुद्दिन खिलजीची भूमिका दुसरा कोणताही अभिनेता पार पडू शकला नसता.
शाह रुख खान
बॉलीवूडचा किंग शाह रुख विशेष म्हणजे त्याच्या रोमँटिक चित्रपटांमुळे जगप्रसिद्ध आहे. नव्वदपासून बी टाऊनवर दबदबा असलेल्या शाह रुख आजही बॉलीवूडवर राज करत आहे. किंग SRK ने बादशाह मध्ये खलनायकाची भूमिका बजावली होती ज्यात तो सायको प्रियकराचे पात्र निभावत होता.
रितेश देशमुख
महाराष्ट्राचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने एक व्हिलन चित्रपटात व्हिलनची भूमिका केली होती. रितेशच्या अभिनयाने मोठ्या मोठ्या अभिनेत्यांचा घाम काढला होता .