राझ, अलोन, जिस्म आणि धूम सारख्या अनेक चित्रपटांतून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री बिपाशा बासू सध्या फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहे. बॉलिवूड अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केल्यापासून बिपाशाने फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली आहे. बिपाशा आणि करण सिंगने भूषण पटेलच्या ‘डेंजरस’ वेबसीरीजमध्ये काम केलं आहे. ती वेबसीरीज बिपाशाची शेवटची वेबसीरीज ठरली. त्या सीरीजचा निर्माता गायक मिका सिंह होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायकाने बिपाशावर जोरदार टीका केली आहे.
‘तारक मेहता’मधला ‘मिस्टर अय्यर’ ४४ व्या वर्षीही आहे अविवाहित, अभिनेत्याने खरं कारण सांगत केला खुलासा
मिका सिंगचा करण आणि बिपाशासोबतचा जुना वाद आहे. २०२० मध्ये रिलीज झालेल्या मिका सिंगने निर्मिती केलेल्या ‘डेंजरस’ वेबसीरीजमध्ये करणने आणि बिपाशाने काम केलेलं आहे. मात्र त्या दोघांनी तेव्हा शुटिंगवेळी खूप नखरे दाखवले होते. गायकाने याआधीही याबाबत एका मुलाखतीत सेलिब्रिटी कपलसोबतचा काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. आता त्याने पुन्हा एकदा करण आणि बिपाशाबद्दल वक्तव्य केले आहे. नुकतंच मिका सिंगने पिंकव्हिलाला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत गायकाने बिपाशा आणि तिच्या पतीसोबतचा कामाचा अनुभव सांगितला आहे.
गायकाने ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत बिपाशाविषयी बोलताना तो म्हणाला की, “तुम्हाला काय वाटतं? तिला काम का मिळत नसेल? देव सगळं बघतोय”, पुढे मुलाखतीत मिका सिंग म्हणाला की, “मला आधीपासून करण आवडायचा. मला ‘त्या’ चित्रपटाच्या माध्यमातून माझं संगीत प्रेक्षकांसमोर आणायचं होतं म्हणून मी त्या वेबसीरिजसाठी गुंतवणूक केली होती. त्यामुळे माझ्या म्युझिकलासुद्धा फायदा झाला असता. मला फक्त कमी पैशांमध्ये चार कोटींच्या बजेटमध्ये माझा प्रोजेक्ट बनवायचा होता. भूषण पटेल यांना दिग्दर्शक म्हणून निवडले, याआधी त्यांनी ‘अलोन’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यामध्ये बिपाशाने दुहेरी भूमिका साकारली होती.”
Captain Rohit Sharma चा सिनेमा तुम्ही पाहिलात का ? क्रिकेटरने केलंय दिग्गज कलाकारांसोबत काम
“विक्रम भट्ट सरांनी कथा लिहावी अशी माझी इच्छा होती. कारण दिग्दर्शक म्हणून मी त्यांची निवड करू शकत नव्हतो. माझा तेवढा बजेटच नव्हता. करण आणि एका नवोदित अभिनेत्रीसोबत आम्हाला या सीरिजमध्ये काम करायचं होतं. पण मध्येच प्रोजेक्टमध्ये बिपाशाने उडी घेतली. वेबसीरिजचं शूटिंग लंडनमध्ये पार पडलं आणि बजेट अचानक चार कोटींवरून चौदा कोटींवर गेला. बिपाशा बासूने केलेला ड्रामा पाहून मला प्रॉडक्शनमध्ये पाऊल ठेवल्याचा खूप पश्चात्ताप झाला. करण तिचा पती असूनही तिने किसिंग सीन देण्यास नखरे केले. मी हे करणार नाही, ते करणार नाही… असा तिचा ड्रामा सुरू झाला होता. ”
मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल
“डबिंगच्या वेळी नेमका कोणाचा ना कोणाचा घसा खराब झालेला असायचा. एकेदिवशी बिपाशाच आजारी पडायची, तर दुसऱ्या दिवशी करण आजारी पडायचा. ज्या अभिनेत्रींच्या हातात काम नाही, त्यांनी संधी देणाऱ्या निर्मात्यांचा आदर केला पाहिजे. काम देणारा व्यक्ती देवतासमान असतो. त्यांना धर्मा प्रॉडक्शन्समध्ये छोटीशी भूमिका पण चालेल, पण तेवढेच पैसे देणाऱ्या नवोदित निर्मात्यांचा ते आदर करणार नाही.”