Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

kohrra 2 ’मध्ये स्त्रीशक्तीचा ठसा, पूजा भामर्रांची दमदार भूमिका चर्चेत, आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली…

‘कोहरा 2’मध्ये कुटुंब, नातेसंबंध आणि समाजातील स्त्रीची भूमिका यावर संवेदनशील पद्धतीने प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रीतची कहाणी अनेक महिलांच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारी आहे, त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनाला भिडते.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 16, 2026 | 07:03 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कोहरा 2 या लोकप्रिय मालिकेचा दुसरा भाग आता नेटफ्लिक्सवर वर स्ट्रीम होत आहे. ‘कोहरा 2’मध्ये अभिनेत्री पूजा भामर्रा यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्वात दमदार आणि भावनिक भूमिका साकारली आहे.

या नव्या सिझनमध्ये त्या प्रीत बाजवा या व्यक्तिरेखेत दिसत आहेत. प्रीत ही अशी स्त्री आहे जी पितृसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीत, शांततेत आणि सततच्या त्यागात आयुष्य जगते. मात्र परिस्थिती बदलत जाते आणि शेवटी ती स्वतःसाठी उभी राहण्याचा धाडसी निर्णय घेते.

‘कोहरा 2’मध्ये कुटुंब, नातेसंबंध आणि समाजातील स्त्रीची भूमिका यावर संवेदनशील पद्धतीने प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रीतची कहाणी अनेक महिलांच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारी आहे, त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनाला भिडते. सशक्त अभिनय आणि भावनिक कथानकामुळे ‘कोहरा 2’ सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

या सीझनमध्ये प्रीतची कथा अशा कुटुंबात दाखवली आहे जिथे पुरुषांचे वर्चस्व आहे. अनेक वर्षे तिने मुलगी, बहीण, पत्नी आणि आई म्हणून इतरांच्या अपेक्षेनुसार जीवन जगले. ती शांत राहिली, तडजोड करत राहिली आणि स्वतःला इतरांच्या इच्छेनुसार घडवत राहिली. पण जेव्हा तिच्या कुटुंबातील सत्य समोर येऊ लागते, तेव्हा तिला कठोर वास्तवाचा सामना करावा लागतो. ज्यांच्यावर तिने विश्वास ठेवला, त्यांच्याकडूनच तिला फसवणूक होते. तिला जाणवते की आता शांत राहणे अधिक कठीण झाले आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणी ती एक निर्णय घेते. हा निर्णय रागातून नाही, तर स्वतःला वाचवण्यासाठी घेतलेला असतो आणि हाच निर्णय तिचे आयुष्य बदलून टाकतो.

Vijay Deverakonda-Rashmika Mandanna लग्नबंधनात अडकणार? लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ दिवशी पार पडणार शाहीसोहळा

आपल्या भूमिकेबद्दल पूजा म्हणाली, “प्रीत बाजवा एका साध्या पंजाबी कुटुंबातून येते, जिथे पुरुषांचेच वर्चस्व असते. तिने आपले आयुष्य आधी भावाच्या आणि नंतर पतीच्या मर्जीनुसार जगले. पण आता ती आपल्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेऊ इच्छिते. लोक काय म्हणतील याची तिला आता चिंता नाही. ती पहिल्यांदाच स्वतःसाठी जगू इच्छिते. तिच्यासाठी आता बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. लोक काय विचार करतील, कुटुंब काय म्हणेल, याचा तिला फरक पडत नाही. अगदी तिचा पती आणि मुले सुद्धा नाहीत. ती आपल्या निर्णयांबाबत कुणालाही घाबरत नाही. आता ती मोकळेपणाने जगू इच्छिते. पुढे काय होईल, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा मालिकाच पाहावा लागेल.”

पूजासाठी प्रीतची भूमिका साकारणे सोपे नव्हते. ती म्हणाली, “कथा चांगली लिहिलेली असेल तर काम सोपे होते. सर्वप्रथम आम्ही आमचे दिग्दर्शक सुदीप सर आणि फैसल यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी मला प्रीतच्या जगाची ओळख खूप साध्या आणि स्पष्ट पद्धतीने करून दिली. त्यानंतर आमचे अभिनय प्रशिक्षक नितीन गोयल यांच्यासोबत कार्यशाळा झाली. त्यांनी मला आणि रणविजयला आमच्या भूमिकांमधील नाते समजून घेण्यासाठी खूप मदत केली. हा अनुभव खूप खास होता, पण भावनिकदृष्ट्या थकवणारा देखील होता.”

Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

कथेत पती-पत्नीच्या नात्याला योग्य प्रकारे दाखवण्यासाठी भरपूर तयारी करण्यात आली. या कार्यशाळांमुळे पूजा आणि रणविजय यांनी त्यांच्या भूमिकांतील ताण आणि भावना वास्तववादी पद्धतीने साकारल्या.

‘कोहरा 2’ मध्ये पूजा भामर्रा केवळ अभिनय करत नाहीत, तर एका अशा स्त्रीची कथा साकारतात जी स्वतःचे आयुष्य स्वतः निवडते. प्रीत बाजवाची कथा खरी, भावनिक आणि प्रेरणादायी आहे. त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ लक्षात राहील.

Web Title: Kohrra 2 highlights women empowerment pooja bhamrrah powerful performance is making headlines speaking about her role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Web Series

संबंधित बातम्या

चालू कॉन्सर्टमध्ये ‘हा’ सुप्रसिद्ध गायक थुंकला चाहत्यावर! म्हणाला “तुझ्या बहिणीला…” नेमकं काय घडलं?
1

चालू कॉन्सर्टमध्ये ‘हा’ सुप्रसिद्ध गायक थुंकला चाहत्यावर! म्हणाला “तुझ्या बहिणीला…” नेमकं काय घडलं?

2-3 तास makeup करून म्हातारा झालो अन्… अभिनेता मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
2

2-3 तास makeup करून म्हातारा झालो अन्… अभिनेता मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

Video: हनी सिंहच्या कॉन्सर्टमध्ये उडाला गोंधळ; बंद गेटवर चढली महिला फॅन, सिक्युरिटी गार्ड्सना शिवीगाळ
3

Video: हनी सिंहच्या कॉन्सर्टमध्ये उडाला गोंधळ; बंद गेटवर चढली महिला फॅन, सिक्युरिटी गार्ड्सना शिवीगाळ

अक्षय खन्ना ‘महाकाली’मध्ये शुक्राचार्यच्या भूमिकेत; ‘रहमान डकैत’नंतर फॅन्ससाठी मोठं सरप्राइज
4

अक्षय खन्ना ‘महाकाली’मध्ये शुक्राचार्यच्या भूमिकेत; ‘रहमान डकैत’नंतर फॅन्ससाठी मोठं सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.