फोटो सौजन्य - Social Media
जुलैच्या १२ तारखेला मुंबई येथील वांद्रे कुर्ला संकुलनात जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे अनंत राधिका यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाहात दूरवरून अगदी परदेशातून दिग्गज पाहुणेमंडळी उपथित होते. पाहायला गेले तर, अनंत – राधिकाच्या लग्नाचा सोहळा तसा फार शाही आणि लांब होता. या लग्न सोहळ्यात अनके प्रकारच्या विधी अगदी राजेशाही पद्धतीने पार पडला. लग्नाच्या नंतरच्या दिवशी त्याच ठिकाणी अनंत आणि राधिकाचा शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. या सोहळ्यात जगभरातून विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी अनंत राधिकाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यातील पाहुणे मंडळी त्यांच्या वेगवेगळ्या आऊटफिट्समुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. बॉलीवूडच्या कलाकारांनी तर त्यांच्या लूकने हवाच केली होती.
दरम्यान अंबानी कुटुंबीयांचा पारंपरिक पोशाख आणि महागड्या दागिन्यांचा भांडार सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. अंबानी कुटुंबीय संस्कृती जपण्यात आणि तिचा प्रसार करण्यात कधीच मागे पडत नाही. हे त्यांनी पुन्हा एकदा या लग्न सोहळ्यात दाखवून दिले. अंबानी कुटुंबीयांनी लग्न सोहळ्यात पारंपरिक पोशाखाला पसंती देऊन परदेशी पाहुण्यांमध्ये आपल्या संस्कृतीचा एकप्रकारे प्रसारच केला आहे. यादरम्यान, सासू- सुनेच्या पेहराव्यामध्ये एक गोष्ट समांतर दिसून आली आहे. नीता अंबानी आणि नुकतेच त्यांच्या कुटुंबाचा नवीन भाग झालेली अनंताची पत्नी राधिका, या दोघांनी लग्नाच्या दिवशी त्यांच्या मनगटामध्ये काळ्या रंगाचा धागा परिधान केला होता, जी एक आकर्षणाची गोष्ट होती.
मनगटात काळ्या रंगाचा धागा बांधण्याचे कारण?
भारतामध्ये अनेक लोकांनी मनगटावर काळा धागा बांधलेला अनेकदा नजरेस आले असेल. सुप्रसिद्ध पंडित अरुणेशजी शर्मा सांगतात कि, मनगटावर काळा धागा बांधण्यामागे मुख्य कारण स्वतःला नजरेपासून वाचवणे असते. मुख्यतः शनीच्या नजरदोषापासून वाचण्यासाठी लोकं त्यांच्या मनगटावर काळा धागा बांधतात. हिंदू धर्मात असे म्हणतात कि, शनीची दृष्टी खुप तीक्ष्ण असते. ज्या कुणावर ही दृष्टी पडते त्याला अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो. शनीच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी लहान मुलांना कमरेवर तर प्रौढांच्या मनगटावर काळा धागा बांधला जातो.