(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सोनी सब टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये ‘सोढी’ची भूमिका करणारा अभिनेता गुरुचरण सिंह गेले ४ वर्ष अभिनयापासून दूर आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी तो अचानक गायब झाले होता. कोरोना महामारीनंतर, सुमारे ३ वर्षांपूर्वी, गुरुचरण अचानक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. तो दिल्लीहून मुंबईला निघाला होतो, पण मधेच गायब झाला. सुमारे तीन आठवड्यांनंतर, तो स्वतः घरी परतला. ही बातमी येताच चाहत्यांमध्ये मोठी चर्चा झाली. पण त्यावेळी त्यांने सांगितलं की त्याला आर्थिक अडचणी होत्या. त्याने हेही मान्य केलं की, अभिनय सोडल्यानंतर त्याच्या खाजगी आयुष्यात अनेक अडथळे आले. त्यामुळेच ते काही काळ सगळ्यांपासून दूर राहिला.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘सोढी’ची भूमिका करणारे अभिनेते गुरुचरण सिंहने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलं की, लवकरच ते एक मोठी खुशखबर सांगणार आहेत.त्यानं नेमकं काय सांगणार आहे, हे त्यांनी सांगितलेलं नाही.
कॉमन फ्रेंड की ‘अजून काही’?, घटस्फोटांच्या अफवांदरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसला ‘नील’
गुरूचरण सिंह याने पोस्ट केलेल्या नव्या व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या व्हिडिओवर उत्सुकता आणि आनंद व्यक्त केला आहे. एका चाहत्याने कमेंट केली आहे, “तुम्ही ‘तारक मेहता’मध्ये परत येणार असाल, तर याहून मोठी गुड न्यूज काहीच नाही!” तर दुसऱ्याने लिहिलं, “म्हणजे तुम्ही शोमध्ये परत येताय ना?”.अजून एका चाहत्याने भावनिक विनंती केली आहे, “पाजी, खुशखबर म्हणजे तुम्ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये परत येताय, हेच ना? एकदा तरी होकार द्या… मन खुश होईल!” अश्या अनेक कमेंट्स चाहत्यांच्या पाहायला मिळत आहेत.
गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्यानंतर सगळेच चिंतेत होते, मात्र, सुमारे ३ आठवड्यांनंतर तो स्वतः घरी परतला. गुरुचरण याने दिल्लीत पोलिसांना सांगितलं की, तो एका आध्यात्मिक प्रवासावर गेला होता. या काळात त्याने अमृतसर, लुधियाना आणि इतर काही शहरांतील गुरुद्वाऱ्यांना भेट दिली.पुढे कुटुंबाची काळजी वाटू लागल्यामुळे त्याने घरी येण्याचा निर्णय घेतला.