गर्बाचा शाब्दिक अर्थ आहे गर्भ दीप. गर्भ दीप स्त्रीच्या गर्भाशयात असलेल्या शक्तीचं प्रतिक मानलं जातं. याच शक्तीची देवी दूर्गेच्या रूपात पूजा केली जाते.
सुरू झाला गरबा
पहिले गरब्याचं आयोजन फक्त गुजरातमध्ये केल्या जायचं. गरबा हे नृत्य गुजराती लोकांच्या प्रतिष्ठेत केलं जायचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा गुजराती लोकांनी त्यांच्या प्रांतातून बाहेर पडायला सुरूवात केली तेव्हा अन्य प्रदेशांमध्येही ही परंपरा रूढ झाली. आज गरबा विदेशातही आयोजित केला जातो.
असा सुरू होतो गरबा
गरबा खेळायला सुरूवात करण्याआधी मातीच्या मडक्याला अनेक छिद्र पाडत त्यात एक दिवा लावला जातो. असे करत देवीच्या शक्तीला आव्हाहन केलं जातं. नंतर याच मडक्याच्या चौफेर महिला नृत्य करत देवीला प्रसन्न करत असतात.
तीन टाळ्यांचं रहस्य
गरबा करताना तुम्ही अनेकदा महिलांना तीन टाळ्यांचा प्रयोग करताना बघितलं असेल. या तीन टाळ्या ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वराला समर्पित केल्या जातात. गरबा नृत्यात तीन टाळ्या वाजवत ब्रम्हांडातील तीन्ही देवांना आव्हान केल्या जातं.
Web Title: Gujarats garbach name abroad learn the information nrrd