जगातील अशी 6 ठिकाणे जिथे सूर्य कधीही मावळत नाही, फिरायचे असेल तर इथे नक्की जा...
आइसलँड हे युरोपमधील सर्वात मोठ्या आणि सर्वात सुंदर बेटांपैकी एक आहे. इथले मुख्य आकर्षण म्हणजे, जूनमध्ये इथे सूर्य कधीच मावळत नाही. आकाशात २४ तास सूर्याचा प्रकाश असतो. स्वप्नवत अनुभवासाठी या ठिकाणाला भेट देणे चांगला पर्याय ठरेल.
स्वीडनचा स्वतःचा असा सूर्यास्ताचा वेळदेखील आहे. मे ते ऑगस्ट अखेरपर्यंत इथे सूर्य मध्यरात्री मावळतो आणि पहाटे ४ वाजता तो पुन्हा उगवतो. यामुळे अनेक महिने इथे सतत सूर्यप्रकाश असतो.
फिनलँडमध्ये वर्षाच्या काही भागात सूर्य ७३ दिवस सतत आकाशात राहतो. लोक याकाळात रात्रीच्या अंधाराची अपेक्षी ठेवत नाही. पण डिसेंबर आणि जानेवारी दरम्यान हिवाळा येतो तेव्हा दृश्य पालटते आणि याकाळात इथे सूर्य अजिबात चमकत नाही.
अमेरिकेतील अलास्का राज्यातील बॅरो फार खास आहे कारण मे महिन्याच्या अखेरीस ते जुलैच्या अखेरीस येथे सूर्य मावळत नाही. मात्र हिवाळ्यात नोव्हेंबर ते डिसेंबरच्या काळात इथे संपूर्ण अंधार दिसून येतो. याला पोलर नाईट्स असे म्हटले जाते.
कॅनडाचे नुनावत शहर एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. येथे सुमारे दोन महिने सूर्य अजिबात मावळत नाही, म्हणजेच दरवर्षी सलग दोन महिने सूर्य इथे दिसून येतो. पण जेव्हा हिवाळ्याचा काळ येतो तेव्हा इथे सूर्य अजिबात दिसून येत नाही, ज्यामुळे याकाळात इथे अंधार पसरतो.