केसांचा गुंता, केसातील घाण, केसगळती, टक्कल पडणे, केसात कोंडा होणे अशा एक ना अनेक समस्या प्रत्येकाला असतात. पण त्यासाठी तुम्ही घरगुती उपायात कॉफीचा वापर करून केसांच्या समस्या त्वरीत सोडवू शकता. कशी वापराल केसांसाठी कॉफी जाणून घ्या
तुम्हाला एक वाडगा घ्यायचा आहे आणि त्यात एक चमचा कॉफी आणि 2 चमचे दही चांगले मिसळून केसांना लावावे लागेल. 30 मिनिटे ठेवल्यानंतर केस धुवा. हा उपाय 2 आठवडे वापरल्याने तुमचे केस फ्रिजी झाले असतील तर त्याचा गुंता सुटेल आणि मोकळे होतील
जर तुमचे केस पातळ असतील तर 1 चमचा कॉफीमध्ये अंड्याचा पांढरा भाग मिसळा आणि केसांना लावा आणि 30 मिनिटे ठेवा. नंतर केस सामान्य पाण्याने धुवा. आठवड्यातून किमान एक वेळा तुम्ही याचाच वापर केला तर तुमच्या पातळ केसांची समस्या सुटण्यास मदत मिळते
केसांमध्ये कोंडा असेल तर या समस्येसाठी 1 चमचा कॉफी पावडरमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा आणि केसांना लावा. सुमारे 20 मिनिटे केसांवर ठेवा आणि नंतर केस धुवा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा वापरू शकता आणि यामुळे केसांना मऊ आणि मुलायमपणा येईल हेदेखील तुम्हाला दिसून येईल
1 चमचा कॉफी आणि 1 चमचा खोबरेल तेल चांगले मिसळा आणि केसांना लावा आणि सुमारे 1 तास राहू द्या. आठवड्यातून एकदा हा उपाय वापरून तुम्ही तुमचे लांब केस निरोगी बनवू शकता. यामुळे केसांची चांगली वाढ होऊन केस लवकर वाढण्यास मदत मिळते
केसांना चमक येण्यासाठी एक चमचा मधामध्ये एक चमचा कॉफी मिसळा आणि केसांना नीट लावा आणि 20-30 मिनिटे तसेच राहू द्या. केस धुतल्यानंतरच तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. केसांवर एक वेगळीच चमक येईल आणि त्याशिवाय तुमचे केस नैसर्गिकरित्या ब्राऊनही दिसतील आणि आकर्षकता जाणवेल
1 चमचा कॉफी आणि 1 चमचा रोझमेरी तेल मिसळा एकत्र मिक्स करा आणि आठवड्यातून एकदा केसांवर वापरा. मग बघा ही रेसिपी कसा प्रभाव दाखवते. यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते आणि केसगळतीदेखील होत नाही
सॉफ्ट आणि सिल्की हेअर मिळविण्यासाठी 1 चमचा कॉफी आणि 1/2 चमचा मॅश केलेला अवाकाडो एकत्र मिसळा, केसांना लावा आणि 30 मिनिटे केसांवर राहू द्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही केस धुता तेव्हा तुम्हाला त्वरीत त्याचा योग्य परिणाम दिसून येतो आणि केस तुमच्या हातांना अधिक मऊ आणि मुलायम जाणवतात