Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेडिकलमध्ये MBA करा आणि मिळवा ऑफिसरचा रुतबा अन् लाखांचे पॅकेज! जाणून घ्या हाय-पेईंग कोर्सबद्दल…

हेल्थकेयर क्षेत्र आता केवळ डॉक्टरांपुरते मर्यादित नसून, कुशल मॅनेजर्सचीही मोठी गरज निर्माण झाली आहे. MBA इन हेल्थकेयर केल्यास वैद्यकीय आणि व्यवस्थापन कौशल्यांचा संगम साधता येतो .

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 23, 2026 | 05:06 PM
मेडिकलमध्ये MBA

मेडिकलमध्ये MBA

Follow Us
Follow Us:
  • मेडिकल क्षेत्रात करिअरची ‘सुवर्णसंधी’
  • MBA ठरू शकतं तुमच्या करिअरसाठी ‘बूस्टर डोस’ ?
  • कशी ठरेल करीअरसाठी सुवर्ण संधी?
Career News: येणाऱ्या काळात हॉस्पिटलला जेवढी डॉक्टरांची गरज भासेल, तितकीच गरज कुशल मॅनेजर्सचीही असेल, हे तुम्हाला माहिती आहे का? हेल्थकेयरचे जग आता केवळ स्टेथोस्कोप आणि पांढऱ्या कोटापुरते मर्यादित राहिलेले नाही. आज जेव्हा अपोलो, मॅक्स आणि फोर्टिस सारखी हॉस्पिटल्स एखाद्या कॉर्पोरेट साम्राज्याप्रमाणे काम करत आहेत. तेव्हा हे चालवण्यासाठी ‘बिझनेस माईंड’चीही तितकीच गरज भासत आहे. कॉर्पोरेट जगतात उच्च पगार आणि रुतबा मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ‘मेडिकल MBA’ हे एखाद्या सोन्याच्या खाणीसारखं करिअर ठरत आहे.

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नॅशनल बँकमध्ये ५ हजारहून अधिक जागांची भरती; ‘असा’ करा अर्ज!

MBA ठरू शकतं तुमच्या करिअरसाठी ‘बूस्टर डोस’ ?

जर तुम्ही MBBS, BDS, नर्सिंग किंवा B.Pharma सारखे मेडिकल कोर्सेस केले असतील, तर एमबीए (MBA) तुमच्या करिअरसाठी ‘बूस्टर डोस’ ठरू शकतं. हेल्थकेयरमध्ये MBA केल्यानंतर तुमच्या  उत्पन्नात आणि पदात एका रात्रीत मोठा फरक पडेल. पण प्रश्न असा आहे की, या क्षेत्रात पाऊल कसे ठेवायचे? कोणता कोर्स तुमचे नशीब बदलू शकतं? जाणून घेऊया हेल्थकेयर मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्यात करिअर कसे घडवायचे. विशेष म्हणजे, MBBS शिवाय तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता, परंतु मेडिकल डिग्री असणे तुमच्यासाठी ‘बोनस पॉईंट’ ठरेल.

हेल्थकेयरमध्ये MBA म्हणजे काय?

हेल्थकेयर किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंटमधील MBA हा एक प्रोफेशनल मास्टर डिग्री कोर्स आहे. ज्यात वैद्यकीय आणि व्यवसायाची सर्व कौशल्ये एकत्रितपणे शिकवली जातात. हेल्थकेयर मॅनेजर रुग्णांवर उपचार करत नाहीत, तर ते त्या ‘सिस्टम’वर उपचार करतात ज्याद्वारे हॉस्पिटल चालते. यामध्ये हॉस्पिटल ऑपरेशन्स, हेल्थ पॉलिसी, मेडिकल एथिक्स आणि सप्लाय चेन यांसारखे विषय शिकवले जातात.

हेल्थकेयर मॅनेजमेंटसाठी पात्रता काय?

‘MBA इन हेल्थकेयर’ कोर्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात कोणीही प्रवेश घेऊ शकतो. मात्र, जर तुम्ही लाइफ सायन्सेस किंवा मेडिकल बॅकग्राउंडमधून शिक्षण घेतले असेल, तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

पदवी (Graduation): किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.

प्रवेश परीक्षा: CAT, XAT, MAT, SNAP किंवा CMAT यांसारख्या परीक्षांद्वारे तुम्ही टॉप कॉलेजेसमध्ये प्रवेश घेऊ शकता.

स्पेशलायझेशनचे विविध पर्याय:

मेडिकल MBA अंतर्गत विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करू शकतात १. हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन: हॉस्पिटलमधील दैनंदिन उपक्रम व्यवस्थापित करणे. २. फार्मास्युटिकल मॅनेजमेंट: औषधांचे मार्केटिंग, रिसर्च आणि सेल्स सांभाळणे. ३. हेल्थ इन्शुरन्स: विमा कंपन्यांसाठी मेडिकल एक्सपर्ट म्हणून काम करणे. ४. हेल्थ आयटी (IT): हॉस्पिटलचा डिजिटल डेटा आणि सॉफ्टवेअर सिस्टम मॅनेज करणे.

करिअरच्या संधी

हेल्थकेयर मॅनेजमेंटची पदवी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काही वरिष्ठ पदांवर नोकरी मिळू शकते. CEO/COO (हॉस्पिटल): मोठ्या वैद्यकीय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. क्लिनीकल मॅनेजर: रेडिओलॉजी किंवा कार्डिओलॉजी सारख्या विशिष्ट विभागाचे व्यवस्थापन. हेल्थ कन्सल्टंट: सरकारी किंवा खाजगी संस्थांना आरोग्य सेवांबाबत सल्ला देणे.

पगार किती मिळेल?

पगाराच्या बाबतीत हे क्षेत्र अत्यंत आकर्षक आहे. भारतात या क्षेत्रातील फ्रेशर्सना सुरुवातीला ६ ते १० लाख रुपयांचे पॅकेज मिळते. जर तुम्ही IIM किंवा TISS सारख्या नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतले, तर हे पॅकेज वार्षिक १५ ते २५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. काही वर्षांचा अनुभव आल्यानंतर हा आकडा सहज ४०-५० लाख रुपयांच्या पुढे जातो.

218000 मिळणार पगार! असिस्टंट प्रोफेसर बनण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?

Web Title: Mba in healthcare management career salary eligibility marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Career
  • career guide
  • Career News
  • hair care
  • health care news
  • MBBS

संबंधित बातम्या

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज
1

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज

Women’s Health: महिलांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम करतात ‘या’ ५ सवयी, वेळेत बदला नाहीतर होईल नुकसान
2

Women’s Health: महिलांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम करतात ‘या’ ५ सवयी, वेळेत बदला नाहीतर होईल नुकसान

Career Options After 12th: मल्टीनेशनल कंपनीत काम करायचयं! मग १२ वी नंतर ‘हे’ कोर्सेस ठरू शकतात करिअरसाठी गेमचेंजर
3

Career Options After 12th: मल्टीनेशनल कंपनीत काम करायचयं! मग १२ वी नंतर ‘हे’ कोर्सेस ठरू शकतात करिअरसाठी गेमचेंजर

Lungs Health: फक्त सिगारेट सोडून उपयोग नाही! ‘या’ सवयीही करू शकतात फुफ्फुसांचे गंभीर नुकसान
4

Lungs Health: फक्त सिगारेट सोडून उपयोग नाही! ‘या’ सवयीही करू शकतात फुफ्फुसांचे गंभीर नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.