Kaumudi Walokar Wedding Grahmukh Vidhi Photos
सध्या सर्वत्रच लग्नाची लगबग सुरु आहे. अशातच अनेक सेलिब्रिटीही लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. 'आई कुठे काय करते' फेम कौमुदी वालोकरही लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
अभिनेत्री कौमुदी वालोकरने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर "ग्रहमख" विधीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती तिच्या आई- वडिलांसोबत विधी करताना दिसत आहे. शिवाय तिचे इतर नातेवाईकही या विधीसाठी उपस्थित होते.
"ग्रहमख" विधीसाठी कौमुदीने हिरव्या रंगाची डिझाईनिंग काठ असलेली साडी नेसली आहे. तर मॅचिंग ब्लाऊज कॅरी करत हातात हिरव्या बांगड्याही तिने ठेवल्या आहेत. शिवाय डोक्यावर मुंडावळ्या बांधत तिने काही फोटो शेअर केले आहेत.
कौमुदीने गेल्या वर्षाच्या अखेरीस साखरपुडा केला होता. आता ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला असून भावी आयुष्याच्या चाहत्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे. आकाश हा उच्च शिक्षित आहे. त्याने एज्युकेशनमध्ये पीएचडी केली आहे. कौमुदी आकाशसोबत सात फेरे घेत संसार थाटणार आहे. कौमुदी पेशाने सेलिब्रिटी असून अभिनेत्रीचा होणारा नवरा फिल्म इंडस्ट्रीतला नव्हता.
Kaumudi Walokar Wedding Grahmukh Photos (6)