'हे' आहे जगातील सगळ्यात स्ट्राँग अल्कोहोलिक ड्रिंक
व्हिस्की आणि टकीला सारख्या अल्कोहोलिक ड्रिंकला ॲब्सिन्थने मागे टाकले आहे. हे ड्रिंक व्हिस्की आणि टकिलापेक्षा खूप जास्त स्ट्राँग आहे. भारताची प्रसिद्ध वाइन एक्सपर्ट सोनल हॉलंड यांनी सांगितल्यानुसार, या दोघांपेक्षा कितीतरी पटीने ॲब्सिन्थ स्ट्राँग आहे. या ड्रिंकमध्ये 60 ते 75 टक्के अल्कोहोल असते.
हिरव्या रंगाचे ॲब्सिन्थ बडीशेप, नागदॉना (वर्मवूड) आणि इतर वेगवेगळ्या हर्ब्सपासून बनवली जाते. याची चव हर्बल आणि मसालेदार लागते. इतर ड्रिंक ब्राउन किंवा पारदर्शक असतात, पण ॲब्सिन्थचा रंग चमकदार हिरवा असतो, ज्याला “ला फी व्हर्ट” असे सुद्धा म्हणतात.
ॲब्सिन्थ ड्रिंक पिताना त्यात केवळ पाणी न मिक्स करता साखर सुद्धा टाकली जाते. वाइन एक्सपर्ट सोनल हॉलंड यांनी सांगितल्यानुसार, ॲब्सिन्थ एवढे स्ट्राँग पेय थेट पिणे शक्य नाही. त्यामुळे ग्लासवर चमचा ठेवून त्यावर साखरेचा तुकडा ठेवला जातो. त्यांनतर त्यावर थंड पाणी ओतले जाते. थंड पाणी ओतल्यानंतर ते हळूहळू विरघळते. या संपूर्ण प्रक्रियेला “लाऊझिंग” असे म्हणतात.
ॲब्सिन्थ ड्रिंक पाणी न टाकता प्यायल्यास ती खूप जास्त चढते. यामुळे शरीरसंबंधित कोणतीही गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ॲब्सिन्थ पिण्याआधी त्यात पाणी आणि साखर मिक्स करून प्यावी.
ॲब्सिन्थमध्ये 75 टक्क्यापर्यंत अल्कोहॉल असते, ज्यामुळे चव अतिशय कडवट लागते. तसेच प्यायल्यानंतर घशात भाजल्यासारखे किंवा जळजळ वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ॲब्सिन्थ पिण्याआधी खूप जास्त विचार करावा.