‘तमाशा Live’चा भाग असणं हे माझं भाग्य – हेमांगी कवी
‘तमाशा लाईव्ह’(Tamasha Live) हा चित्रपट १५ जुलैला चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi Interview) नवराष्ट्रच्या कार्यालयाला भेट दिली. एका ॲक्टरचं स्वप्न म्हणजे ‘तमाशा लाईव्ह’ अशी प्रतिक्रिया तिने यावेळी व्यक्त केली. या चित्रपटाबाबतचा अनुभवही तिने शेअर केला आहे.