खसादार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर बेस्ट निवडणुकीच्या पराभवावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे बंधू तब्बल २० वर्षांनंतर मराठीसाठी एकत्र व्यासपीठावर आले, मात्र राजकीय युती होईल की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांमधील युतीबाबत मोठं विधान केलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विजयी सभेनंतर राज्यभरात दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही एकजुट होऊ लागली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाचे राज्याच्या राजकीय भवितव्यावर मोठे परिणाम होऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे. गेल्या काही वर्षात दोन्ही ठाकरे बंधुंच्या पक्षांची मोठी पडझड झाली.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण आहे. तब्बल वीस वर्षांनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहेत.
राज्य सरकारच्या हिंदी सक्तीला तीव्र विरोध दर्शवत दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याची भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. त्यानंतर ठाकरे बंधुंनी विजयी सभा घेणार असल्याचे घोषित…