अभिनेत्री हिना खानने शेअर केले नवीन Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. तिचा Wedding Look चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.
अभिनेत्रीने लग्नाच्या दिवशी Pinkish लेहंगा परिधान केला होता. हातावर भरलेली मेहेंदी आणि परिधान केलेले आभूषण तिला अधिक आकर्षक करत आहेत.
अभिनेत्रीने पोस्टखाली लांबच लांब कॅप्शन केला आहे. तिने 'माझ्या आयुष्यातील या खास दिवशी, स्वतःला जसं साधं, स्वच्छ आणि मोकळं ठेवायचं ठरवलं होतं, तसं राहण्यात मी यशस्वी झाले, ही गोष्ट खूपच दिलासा देणारी होती. न भारी लेहंगा, न जड मेकअप, न चमचमीत दागिने, न अवघड केसांची स्टाईल काहीच नव्हतं, तरीही सगळं पूर्ण वाटत होतं.
कारण बाह्य दिखाव्यापेक्षा, मला माझ्या आजूबाजूच्या प्रेमाच्या आणि काळजीच्या शुद्धतेचा जास्त आधार होता. हाच खरा सौंदर्याचा अनुभव होता, आणि त्यातूनच माझ्या चेहऱ्यावर अस्सल तेज झळकत होतं' असे कॅप्शन दिले होते.
लेहेंगा मनीष मल्होत्रा यांनी डिजाईन केला होता, जो चाहत्यांच्या भरपूर पसंतीस आला आहे.