अभिनेत्री मुनमुन दत्ताने शेअर केला तिचा नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या @mmoonstar या इंस्टाग्राम हॅन्डलवर फोटोज शेअर केले आहेत. मुळात, या फोटोजमध्ये तिने परिधान केलेला आऊटफिट पाहण्यासारखा आहे.
अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट केला आहे. या वेशामध्ये अभिनेत्री अगदी बाहुलीसारखी दिसत आहे. तसेच तिलाही आऊटफिट आवडला असल्याचे तिने सांगितले आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये या फोटोशूटबद्दल माहिती दिली आहे. तिने सांगितले आहे कि हे एक डेरी इव्हेंटचे फोटोशूट आहे. तसेच संपूर्ण लुकबद्दल माहिती दिली आहे.
मुळात, अभिनेत्रीचे कौतुक करण्यात चाहत्यांनी कोणतीच संधी सोडली नाही आहे. कॉमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे. एका नेटकऱ्याने तर म्हंटले आहे कि, ' मुनमुन तुला पाहून मला टायटॅनिक सिनेमातील केट विन्स्लेटची आठवण आली आहे."
दिवसाच्या आत पोस्टने १.५० लाखांहून जास्त पसंती मिळवली आहे. पोस्ट नेटकऱ्यांच्या पसंतीत येत आहे आणि सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.