परिणिती चोप्राने गोल्डन स्कर्ट आणि त्यावर शिमरी क्रॉप टॉप घातलेला लुक शेअर केला असून यामध्ये ती अत्यंत सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. परीचा हा लुक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय
शिमरी फुल हँड असा क्रॉप टॉप परफेक्ट स्टायलिश लुक दिसत असून परिणिती चोप्राने हा लुक अत्यंत आत्मविश्वासाने कॅरी केलाय. परीचा हा लुक तुम्ही कोणत्याही पार्टीसाठीही प्रेरणा घेऊन कॅरी करू शकता
या ड्रेसवर परिणितीने केसांना वेव्ही लुक दिलाय आणि जो अत्यंत अप्रतिम आणि कॅची दिसतोय. सध्या वेव्ही हेअरस्टाईलचा ट्रेंड असून हा लुक खूपच क्लासी दिसून येत आहे
हा लुक कॅरी करताना परिणितीने यासह कोणतेही दागिने परिधान केलेले नाहीत. शिमरी लुकसह कोणत्याही दागिन्यांची अशीही गरज भासत नाही. परीने अत्यंत स्टायलिश पद्धतीने हा लुक कॅरी केलाय
परिणितीने या लुकसह संपूर्ण मॅट मेकअप केलाय. फाऊंडेशन, हायलायटर, काजळ, लायनर आणि गोल्डन शिमरी आयशॅडोचा तिने वापर केलाय. तिचा हा लुक पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे
तर या सगळ्यावर तिने ब्राऊन शेड न्यूड लिपस्टिक लावत लुक पूर्ण केलाय. याशिवाय तिने वेगवेगळ्या पोझ देत आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे