हाथ ना आऊँ मैं हूँ ऐसी छलिया…प्राजक्ता माळीच्या गुलाबी रंगात चाहते न्हाले, म्हणतात ‘ब्युटीफूल छलिया’
Prajakta Mali: प्राजक्ता माळी म्हणजे महाराष्ट्राचा क्रश. 2 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असणारी ही अभिनेत्री कधीच आपल्या चाहत्यांना नाराज करत नाही. नुकतेच तिने गुलाबी रंगातील वन शोल्डर गाऊनमधील काही फोटो शेअर केले असून जाणून घेऊया तिची फॅशन.
प्राजक्ता माळीचे अनेक चाहते आहेत आणि ती कधीच आपल्या चाहत्यांना नाराज करत नाही. तिचे लुक्स ती नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकतेच तिने गुलाबी रंगातील काही फोटो शेअर केले असून चाहत्यांनी भरभरून तिला प्रतिसाद दिलाय. ‘हाथ ना आऊँ मैं हूँ ऐसी छलिया’ अशी कॅप्शन पोस्ट करून तिने हे सर्व फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताच्या या अदांनी पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी तिला राजकुमारी म्हटलं असून अत्यंत सुंदर अशी तू छलिया आहेस असंही तिच्या चाहत्याने म्हटलं आहे. तिचा हा स्टायलिश लुक नक्की कसा आहे ते आपण या लेखातून डिकोड करूया. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
[caption id="attachment_546559" align="alignnone" width="1200"] प्राजक्ताने वन शोल्डर ओपन असा गुलाबी ड्रेस घालून वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. एखाद्या पार्टीसाठी हा लुक नक्कीच खास ठरू शकतो. प्राजक्ताचा हा लुक तुम्हालाही कॅरी करता येऊ शकतो. संपूर्ण एका बाजूने ओपन असलेला हा ड्रेस अत्यंत स्टायलिश आणि बोल्ड दिसून येत आहे.[/caption]
[caption id="attachment_546560" align="alignnone" width="1200"] तिने या ड्रेससह लाँग मोत्याचे लडी असणारे कानातले घातले आहे. याला पिंकिश शेड असून या ड्रेससह परफेक्ट मॅच झाले आहेत. तर त्यावर प्राजक्ताच्या अदांनी अधिक जादू केलेली दिसून येत आहे.[/caption]
[caption id="attachment_546561" align="alignnone" width="1200"] यासह तिने एका हातात सेम रंगाचे मोत्याचे तिहेरी असे ब्रेसलेट घालून स्टाईल केली आहे. तर तिच्या मनमोहक अदा दाखवत तिने ही स्टाईल आपल्या चाहत्यांना दाखवली आहे.[/caption]
[caption id="attachment_546562" align="alignnone" width="1200"] हाफ केस वरच्या बाजूला घेऊन तिने बांधले आहेत आणि बाकी केस मोकळे सोडत हेअरस्टाईल केली आहे. जी या ड्रेससह परफेक्ट स्टाईल असल्याचे दिसून येतेय.[/caption]
[caption id="attachment_546563" align="alignnone" width="1200"] ग्लॉसी लाईट पिंक शेड लिपस्टिक लावत तिने आपल्या लुकला चारचाँद लावले आहेत. तिचा हा लुक ग्लॉसी लिप्समुळे अधिक उठावदार दिसून येतोय.[/caption]
[caption id="attachment_546564" align="alignnone" width="1200"] सटल मेकअप तिने यासह केला असून आयलायनर, बेसिक फाऊंडेशन, मस्कारा, हायलायटरचा वापर केल्याचे यामध्ये दिसतेय. तिचा हा लुक तुम्हीही नक्कीच कॅरी करू शकता.[/caption]
Web Title: Actress prajakta mali stuns with her pink one shoulder gown looks ravishing and gorgeous in glam