नाटक, चित्रपट आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. प्रियदर्शनीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या प्रियदर्शनी 'एव्हरेस्ट मराठी'च्या 'अलमोस्ट कॉमेडी' या कॉमेडी शोमुळे चर्चेत आहे. या शोचं अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर होस्टिंग करणार आहे. या शोनिमित्त काही तासांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहेत.
Priyadarshini Indalkar Photos
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहचली आहे. तिच्या विनोदाच्या परफेक्ट कॉमेडी पंचच्या टायमिंगने तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. कायमच आपल्या विनोदामुळे चर्चेत राहणारी प्रियदर्शिनी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटोज् शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये प्रियदर्शनी अगदी मॉडर्न दिसतेय. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमधील फॅशन पाहून चाहते घायाळ झाले असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.
लाईट येल्लो कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करुन अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने सिंपल फुल्ल टॉप आणि येल्लो पलाझो वेअर करुन कॅमेऱ्यासमोर हटके अंदाजात फोटोशूट केले आहे.
सिंपल हेअर स्टाईल, गळ्यात चैन आणि व्हाईट डायमंडचे इयर रिंग्ज असा लूक अभिनेत्रीने केलेला दिसत आहे. अभिनेत्रीच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात असून तिच्या लूकचेही कौतुक केले जात आहे.
न्यूड मेकअप, पिंक सिंपल लिपस्टिक आणि स्टायलिश अंदाज या लूकमध्ये अभिनेत्रीने आपले फोटोशूट केले आहे. दरम्यान, अभिनेत्रीने हा लूक 'एव्हरेस्ट मराठी'च्या 'अलमोस्ट कॉमेडी' या शोच्या इव्हेंट दरम्यान केला होता.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्रियदर्शनीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. प्रियदर्शनीच्या फॅशनचे चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
सोनपरी... प्रियदर्शनी इंदलकरच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांचं वेधलं लक्ष