साडीपासून ते डेनिमपर्येंत अमृताचे अप्रतिम लुक (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अमृताने या फोटोमध्ये स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचे शर्ट परिधान केले आहे. तसेच या ड्रेससह तिने ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातली आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच अप्रतिम आणि सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये अमृताने गुलाबी साडी आणि त्याच्यावर मिक्समॅचिंग लाला रंगाचा ब्लाउस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूप खुलून दिसत आहेत. या साडीसह तिचा साज देखील मनमोहक आहे. तिने केसात गुलाब आणि दागिन्यांची भर दिली आहे.
अमृताने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा आकर्षित कॉर्सेट परिधान केला आहे. ज्यावर राखाडी रंगाची शेड आहे आणि पांढऱ्या रंगाची स्ट्रेट पॅन्ट देखील अभिनेत्री परिधान केली आहे. यामध्ये तिचा लुक खूप डॅशिंग दिसत आहे.
अमृताने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर मॅचिंग कोट घातला आहे. तिचा हा लुक एकदम लेडी बॉस दिसत आहे. या लूकमध्ये तिचा मेकअपही खूप आकर्षित आहे.
अमृताने या फोटोमध्ये लांबलचक निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या मनमोहक अदा दाखवत पोज देत आहे. अमृताचे हे फोटो खूप चर्चेत असून तिच्या या पोस्टला खूप प्रतिसाद मिळाला आहे.
अमृताच्या या सुंदर सेल्फीने चाहत्यांना वेडे केले आहे. यामध्ये अभिनेत्रीने डेनिमचा गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच आकर्षित आणि सुंदर दिसत आहे.