'The Bads of Bollywood'च्या प्रीमियरला संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्री उपस्थिती (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आर्यन खानने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या मालिकेद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. त्याची ही सिरीज आज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय, 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारा बॉबी देओल देखील त्याचा मुलगा आर्यमन देओल आणि पत्नी तान्या देओलसह काळ्या रंगाच्या लूकमध्ये या कार्यक्रमात सहभागी होताना दिसला.
तमन्ना भाटियानेही 'द बॅडीज ऑफ बॉलीवूड'च्या प्रीमियरला हजेरी लावली. तिने चमकदार चांदीच्या पोशाखात चाहत्यांना थक्क केले. तिचा एक्स प्रियकर विजय वर्मा देखील प्रीमियरमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसला.
आर्यन खानला पाठिंबा देण्यासाठी काजोल आणि अजय देवगण यांनीही 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला हजेरी लावली होती. अजय देवगण काळ्या सूट आणि बूटमध्ये दिसला होता, तर काजोल निळ्या स्कर्ट आणि काळ्या टॉपमध्ये दिसली.
या प्रीमियरमध्ये अंबानी कुटुंबही दिसले. अंबानी कुटुंबाचे शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. म्हणूनच, आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या चित्रपटाला पाठिंबा दिला.
संजय कपूर त्यांच्या पत्नी महीप आणि मुलासोबत दिसले. 'द बॅडीज ऑफ बॉलीवूड'च्या प्रीमियरला हजेरी लावली. तसेच संजय कपूर यांचा लूक पाहण्यासारखा होता.