नारळाच्या पाण्याचे अनेक फायदे शरीराला होतात. त्यामुळे डॉक्टरही नियमित नारळाच्या पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात (फोटो सौजन्य - iStock)
एका कप पाण्यात फक्त 48 कॅलरीज असतात, त्यामुळे भरपूर प्यायल्यानंतरही शरीरात कॅलरीज वाढत नाहीत आणि ते सहज पचते. यामुळे हायड्रेशनमध्येही फायदा होतो
नारळाचे पाणी तुम्ही किमान आठवड्यातून ३ वेळा तरी प्यावे याचा आरोग्याला आणि त्वचेलाही फायदा मिळतो
ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी नारळ पाणी पिणे फायदेशीर आहे. यामुळे हृदयविकार टळण्यास मदत होते
नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि ते शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही मदत करते
नारळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्ससारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असून शरीरातील थकवा कमी कर. सोडियम -कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असून लवकर पचते
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा किडनी स्टोन तयार होतात तेव्हा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात, जेणेकरून खडे स्वतःच बाहेर पडतात