'या' 1000cc बाईक्सच्या खास वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया. (फोटो सौजन्य - Social Media)
रेसिंग आणि उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी ओळखली जाणारी 'डुकाटी पॅनिगेल V4 R'. डुकाटीच्या या बाईकला 998cc V4 इंजिन आहे, ज्यामुळे ती अतिशय वेगवान पळते.
स्टाईलिश आणि पॉवरफुल इंजिनसह येणारी 'बीएमडब्ल्यू S1000RR', या बाईकला 999cc चार-सिलेंडर इंजिन आहे. ही बाईक 200+ हॉर्सपावरची क्षमता देते.
यामाहा YZF-R1ची टॉप स्पीड आणि रोडवरील स्थिरता बाइकप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे; 998cc इंजिन असलेल्या या बाईकला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आहे.
स्पीड आणि परफॉर्मन्ससाठी कावासाकीची 'कावासाकी निंजा ZX-10R' बाईक सुपरबाईक कटेगरीत अव्वल आहे. तिच्या 998cc इंजिनमुळे ती ट्रॅकवर कमाल स्पीड गाठते.
रेसिंग फील देणाऱ्या सुझुकी GSX-R1000ला 999cc इंजिन आहे. या बाईकला सर्वाधिक गती आणि उत्कृष्ट ग्रिपसाठी ओळखले जाते.