फोटो सौजन्य - pinterest
तुम्हालाही रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावांना ऑनलाइन राखी पाठवायची असेल, तर तुम्ही पुढील वेबसाईटचा वापर करू शकता. येथे तुम्हाला राखी, भेटवस्तू, चॉकलेट्स आणि मिठाईचे अनेक पर्याय मिळतील. तुम्ही देशात किंवा परदेशातून ऑनलाइन राखीची डिलिव्हरी करू शकता.
Floweraura हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी एक उत्तम डिलीव्हरी पर्याय ठरू शकतो. इथे तुम्हाला अनेक गिफ्ट ऑप्शन्स आणि राखी मिळतील. येथून ऑर्डर केल्यानंतर, तुम्हाला निवडलेल्या तारखेला राखी आणि भेटवस्तू डिलीव्हरी करता येतील.
1800Giftportal एक गिफ्ट पोर्टल आहे ज्यामध्ये तुम्हाला राखी किंवा कोणतीही भेटवस्तू केवळ देशातच नाही तर परदेशातही पाठवण्याचा पर्याय मिळतो. यासाठी तुम्हाला फक्त पोर्टलवर जाऊन तुमच्या आवडीची राखी आणि गिफ्ट निवडावं लागेल.
राखीची डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही Voylla वेबसाइट देखील वापरू शकता. यासाठी वेबसाइटवर जाऊन राखी निवडा आणि तुम्हाला ज्या पत्त्यावर राखी पाठवायची आहे त्याची माहिती वेबसाइटवर शेअर करा.
IGP.com हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्हाला एक्स्प्रेस डिलिव्हरीसह सूट मिळते. एवढेच नाही तर IGP.com मध्ये तुम्हाला नवीन डिझाईन्स आणि गिफ्ट हॅम्पर्सचा पर्यायही आहे.
Rakhi.com हा तुमच्यासाठी पाचवा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या वेबसाइट्सवरून तुम्ही भारतात बसून US, UK, कॅनडा येथे राखी पाठवू शकता. यासोबतच तुम्हाला कोणतीही भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही या वेबसाइटची मदत घेऊ शकता.