Solo Trip :डोंगर,दऱ्या आणि प्राचीन वास्तू; सोलो ट्रिपसाठी 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या
गंगटोक : तुम्हाला जर डोंगर दऱ्य़ांची आवड असेल तर सोलो ट्रीपसाठी गंगटोक हे एक उत्तम ठिकाण आहे. इथला परिसर डोंगर दऱ्यांनी वेढलेला आहे. सिक्किमधलं हे ठिकाण पर्यटकांच्या आवडीचं आहे.
या ठिकाणी रामटेक मठ, त्सुक ला खांग मठ, पेमायांगत्से बौद्ध मठात मनशांतीसाठी अनेक जण येत असतात.
हंपी: जर तुम्हाला शिल्पकला, प्राचीन मंदिरं पाहायला आवडत असतील तर तुम्ही एकदा तरी हंपी भेट द्यायला पाहिजे.
हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील मंदिरं त्य़ांचा इतिहास, बुद्धकालीन लेण्या पाहण्यासाठी परदेशी पाहुण्यांची कायमच या ठिकाणाला पसंती असते.
वाराणसी : गंगा नदीला हिंदू धर्मात देवीसमान पुजलं जातं. वाराणसी येथील गंगा घाट पाहायला पर्यटकांची कायमच पसंती असते.
खास सूर्यास्त पाहण्याासाठी गंगा किनारी पर्यटकांची पसंती असते. या ठिकाणी बोटींगची सुद्धा सोय आहे.
नैनिताल : हिमालयाच्या डोंगर दऱ्यात विसावलेलं मन वेधून घेणारं गाव म्हणजे नैनिताल
या ठिकाण्याला धुक्याचं गाव देखील म्हटलं जातं. डोळ्यांचं पारणं फेडणारं तलवांचं सौंदर्य मनात भरतं. सोलो ट्रीपलसाठी नैनिताल हे उत्तम ठिकाण आहे.