Mouni Roy Saree
मौनी रॉय कायमच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मौनीने आपल्या सौंदर्याच्या, फॅशनच्या आणि अभिनयाच्या जोरावर टेलिव्हिजन आणि बॉलिवूडपर्यंत मजल मारलेली आहे.
नेहमीच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असणाऱ्या मौनीने काही तासांपूर्वीच गुलाबी साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक केले जात आहे. तिच्या सौंदर्याचे जगभरात नेहमीच जोरदार चर्चा होते.
गुलाबी साडी नेसून मौनीने ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज, न्यूड लिपस्टिक आणि ओपन हेअर्स ठेवून कॅमेऱ्यामध्ये एकापेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत. तिच्या फॅशनचे नेटकरी कौतुक करीत असून तिच्या सौंदर्याचेही कौतुक करीत आहेत.
मौनीने "कायमच मुलींसाठी साडी हे वस्त्र सर्वस्व आहे..." असं कॅप्शन देत साडीतले फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या साडीवरील डिझाईन्सने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. शिवाय तिच्या फॅशनचे कौतुक करीत आहे.
मौनीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. पारंपारिक ते वेस्टर्नपर्यंत प्रत्येक लूकमध्ये सुंदर कसे दिसावे हे अभिनेत्रीला माहित आहे.
३ लाखांहून अधिक चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स केले असून चाहत्यांनी आणि काही सेलिब्रिटींनीही मौनीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.