सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा तुपाचे सेवन
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात तुपाचे सेवन करावे. तूप खाल्यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित एक चमचा तूप खावे.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुपाचे सेवन करावे. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील.
तुपामध्ये मोठ्या प्रमाणावर निरोगी चरबी आढळून येते. त्यामुळे शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात तुपाचे सेवन करावे. तूप खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.
फॅटी अॅसिडने समृद्ध असलेले तूप खाणे आरोग्यासाठी गुणकारी ठरते. शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित एक चमचा तूप खावे.
तुपामध्ये असलेले फॅटी अॅसिड त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते. एक चमचा तूप नियमित खाल्यास त्वचेवचरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळण्यास मदत होईल.