वजन कमी करण्यासाठी या भाज्यांचे करा सेवन
कोबीची भाजी पाहून अनेक लोक नाक मुरडतात. मात्र या भाजीमध्ये विटामिन सी, विटामिन बी, कॅल्शियम, लोह, कॅरेटिन इत्यादी घटक आढळून येतात.
वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली अतिशय गुणकारी आहे. कारण ब्रोकोलीमध्ये असलेले गुणधर्म शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करतात.
हिरवे पालेभाज्यांचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. यामुळे शरीर सुधारते. पालेभाज्यांमध्ये तुम्ही पालक, मेथी. मुळा इत्यादी भाज्यांचे सेवन करू शकता.
थंडीच्या दिवसांमध्ये आहारात गाजर, मुळा, काकडी इत्यादी भाज्यांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही सलॅड खाऊ शकता.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात फ्लॉवरचे सेवन करावे. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात.