मनुष्याला अमर बनवू शकते ही टेक्नॉलॉजी, विज्ञानाचा सर्वात मोठा चमत्कार जे बदलेल तुमचं भविष्य
क्रायोनिक्स ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यात मृत शरीराला मायनस ११६ अंश डिग्रीवर गोठवले जाते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, भविष्यात जेव्हा विज्ञान आणखीन प्रगती करेल तेव्हा ते गोठवलेले हे मृत शरीर पुन्हा जिवंत केले जाऊ शकते.
कल्पना करा जर तुमच्या प्रिय व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्याचे शरीर गोठवून त्याला जतन केले जाऊ शकते. जर्मनीची टुमाॅरो बायो कंपनी म्हणते की, हे पाॅज बटण आहे, पूर्णविराम नाही. भविष्यात जेव्हा उपचार उपलब्ध होतील तेव्हा त्याला पुन्हा जिवंत केले जाऊ शकते
मृत्यूनंतर एक खास अॅम्बूलंस शरीराला लॅबमध्ये घेऊन जाते आणि तिथे त्याला लिक्विड नाइट्रोजनमध्ये फ्रिज केले जाते. शरीर फ्रिज केल्याने मृत्यूनंतरही व्यक्तीच्या शरीरातील पेशी जशाच्या तशा राहतात. ही प्रोसेस खरोखरच चमत्कारी आहे
अमेरीका, रशिया, जर्मनी सारख्या देशांमधील शास्त्रज्ञांनी यावर काम सुरु केले जाते. डाॅक्टर जसे कोणताही आजार बरा करतात त्याचप्रमाणे मृत पेशीही पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जात आहे
आतापर्यंत कोणताही गोठलेला माणूस परत आलेला नीही, परंतू विज्ञान मानते की, काळ नक्कीच बदलेल. जसे तंत्रज्ञानाच्या मदतीने टीबीसारख्या आजारांवर माणवाने मात करुन दाखवली तसेच आता हे तंत्रज्ञानही लवकरच शक्य होईल असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे