अन्यथा, मर्यादेच्या बाहेर केलेले प्रोटीन शेकचे सेवन आरोग्यसाठी वाईट! (फोटो सौजन्य - Social Media)
दररोज गरजेपेक्षा जास्त प्रोटीन शेक घेणे पचनावर ताण आणू शकते आणि मूत्रपिंडाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे याचे सेवन गरजेनुसार करावे.
काही प्रोटीन शेक्समध्ये साखर आणि कॅलरी जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे याचे योग्य प्रमाण जाणून घेऊन सेवन करावे.
स्थानिक किंवा कमी दर्जाच्या प्रोटीन पावडरमध्ये हानिकारक रसायने असण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य प्रोटीन पावडर निवडण्यागोदर योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे.
काही लोकांना प्रोटीन शेक्समधील लॅक्टोजमुळे पोटदुखी, गॅस, आणि उलट्या होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. नैसर्गिक आहाराऐवजी केवळ प्रोटीन शेक्सवर अवलंबून राहणे पोषणतत्त्वांच्या कमतरतेला कारणीभूत ठरते.
दीर्घकाळापर्यंत अतिरेकी प्रोटीन शेक्सचे सेवन केल्यास हृदयाचे आजार, रक्तदाब वाढणे यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. नियमित आहार आणि व्यायामाबरोबर योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच प्रोटीन शेक्सचे सेवन करावे.