1767 मध्ये झाला होता वॉशिंग मशीनचा अविष्कार, 'या' महान व्यक्तिला दिलं जातं श्रेय! (फोटो सौजन्य - pinterest)
वॉशिंग मशीनच्या शोधाचे श्रेय जेकब ख्रिश्चन शेफर यांना दिले जाते.
जेकब ख्रिश्चन शेफर यांनी 1767 मध्ये वॉशिंग मशीनचा अविष्कार केला.
यानंतर 30 वर्षांनी, अमेरिकन नॅथॅनियल ब्रिग्ज यांना वॉशिंग मशीनचे पहिले पेटंट मिळाले.
पहिले ड्रम वॉशिंग मशिन 1905 मध्ये तयार करण्यात आले.
1920 च्या सुमारास पहिली इलेक्ट्रिक मशीन अस्तित्वात आली. यामध्ये फक्त रोटेशन सिस्टीम इलेक्ट्रिक होती. उर्वरित नियंत्रणे केवळ मॅन्युअल होती.
1937 मध्ये बेंडिक्स एव्हिएशन कॉर्पोरेशनसाठी काम करताना, अमेरिकन जॉन चेम्बरलेन यांनी एक मल्टीफंक्शनल मशीन शोधून काढले जे एकाच चक्रात धुणे, स्वच्छ धुणे आणि फिरवू शकते.