लालबाग परळमध्ये राहणाऱ्या कोकणवासीय चाकरमानी एकत्र येत या गणेश मंडळाची स्थापना केली.
फक्त संस्कृती आणि परंपराच नाही तर हे मंडळ आजतागायत सामाजिक भान देखील जपत आलेलं आहे.
22 फूट उंच असलेल्या तेजुकायाची मूर्ती पर्य़ावरणपूरक आहे.
गणेशोत्सव म्हणजे फक्त परंपरा आणि संस्कृती नाही तर समाजप्रबोधनाचं माध्यम देखील आहे.
तेजुकाया गणेश मंडळ सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते म्हणजे देखाव्यासाठी.
कधी सुवर्णमंदिर तर कधी शबरीमाला मंदिर या मंदिरांची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आलेली होती.
मंडळाचं यंदा 58 वर्षांची परंपराआहे. मानाच्या गणपतींपैकी एक म्हणून तेजुकायाच्या राजाला देखीव महत्व दिलं जातं.