यंदा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु तिने केलेले विक्रम कोणते यावर एकदा नजर टाका. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी भारतीय महिला आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या कौशल्याने दमदार कामगिरी करून जगाला चकित केले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विनेशने जपानच्या युई सुसाकी ही तिच्या करियरमध्ये एकही सामना न गमावलेली कुस्तीपटूला पराभूत करून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्वार्टर फायनल गाठली होती. युई सुसाकी हिला पराभूत करणारी विनेश ही एकमेव महिला आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग तीन सुवर्ण पदक नावावर केले आहेत. २०१४, २०१८ आणि २०२२ मध्ये सलग तीन वेळा गोल्ड मेडल भारताच्या नावावर करणारी पहिली महिला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आशियाई चॅम्पियनशिप २०२१ मध्ये सुवर्णपदक जिंकले. याशिवाय विनेशने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ३ रौप्य पदकेही जिंकली. एवढेच नव्हे तर २०१८ मध्ये आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक नावावर केले होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये राउंड ऑफ १६, क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्ये टॉप १० खेळाडूंना पराभूत करून फायनल गाठणारी पहिली महिला ठरली आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया