अभिनेत्री दीपिका पादुकोनचा Classy अवतार पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री दीपिका पादुकोन नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये झळकली होती. अभिनेत्री आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख करत आहे.
यावेळी अभिनेत्रीने आकर्षक असा Look केले होते. अभिनेत्री ओव्हरसाइज्ड ब्लेझर ड्रेसमध्ये झळकली होती. सफेद रंगाचा ओव्हरसाइज्ड ब्लेझर ड्रेस, हॅट, स्टायलिश ब्लॅक लेदर ग्लोव्ह्ज, शीअर ब्लॅक स्टॉकिंग्ज आणि पॉइंटेड ब्लॅक पंप्स असा संपूर्ण Outfit दीपिकाने परिधान केला होता.
तिच्या या आकर्षक Lookला पाहून चाहत्यांनी कमालीचे कौतुक केले आहे. बहुतेक चाहत्यांनी तर तिला 'Queen' अशी पदवी दिली आहे.
या छायाचित्रांमधील अत्याधिक आकर्षित करणारी बाब म्हणजे दीपिकाचे गोड हास्य! आणि तिच्या हसण्याने गालावर पडणारी खोल खळी!
@bazaarindia ने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हे Photoshoot शेअर केले आहे. अभिनेत्रीचा हा Classy लुक चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.