अक्रोड खाण्याचे फायदे
वय वाढल्यानंतर हाडे दुखण्यास सुरुवात होते. हाडांचे दुखणे वाढल्यानंतर अनेकदा वेदना सहन होत नाहीत. अशावेळी तुम्ही सकाळी उठल्यानंतर भिजवलेल्या अक्रोडांचे सेवन करू शकता.
बरेच जण वाढलेले वजन कमी करण्यासाठी जीम किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेतात, पण असे न करता नियमित भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
अनेकदा आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यावर भिजवलेले अक्रोड खाल्यास आरोग्याला फायदे होतात.
अक्रोडमध्ये विटामिन ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य निरोगी राहते. तसेच यामुळे मेंदूतील रक्ताभिसरण वाढते. यामुळे प्रोस्टेट कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर इत्यादी आजारांचा धोका टाळतो.
अक्रोडचा वापर गोड पदार्थ, स्मूदी, मिल्कशेक इत्यादी अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.