सर्वाधिक मानधन घेणारी ती अभिनेत्री जिने सहा दशक इंडस्ट्री गाजवली, केलीत लग्न पण तरीही मिळू शकलं नाही खरं प्रेम
या अभिनेत्रीने तब्बल 13 वर्ष बॉक्स ऑफिस गाजवलं. ती त्याकाळची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. मुख्य म्हणजे ही अभिनेत्री बॉलिवूड, टॉलिवूडची नव्हे तर हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एलिझाबेथ टेलर आहे
एलिझाबेथ टेलरने सहा दशक इंडस्ट्री गाजवली. चित्रपटसृष्टीत तिने बालकलाकार म्हणून सुरुवात केली आणि आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले
आपल्या बॅक टू बॅक हिट चित्रपटांनंतर 1960 मध्ये ती चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली. 1957 ते 1970 मध्ये तिने बॉक्स ऑफिस गाजवलं
आपल्या कामाने तिने भरपूर प्रसिद्धी कामवली. तसेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती बरीच चर्चेत राहिली. एलिझाबेथने खऱ्या प्रेमाच्या शोधात 8 वेळा लग्नगाठ बांधली. मजेशीर बाब म्हणजे, एकाच व्यक्तीसोबत अभिनेत्रीने दोन वेळा लग्नगाठ बांधली
अभिनेत्रीने आपलं पाहिलं लग्न कॉनराड निकी हिल्टनशी केलं मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने दुसरा लग्न मायकल वाइल्डिंगशी केलं जो तिच्याहून 20 वर्षांनी मोठा होता पण त्यांचेही लग्न फार काळ टिकू शकलं नाही
तिसरं लग्न तिने मायकल टॉडशी केलं ज्याचं निधन झाल्यानंतर तिने एडी फिशर नावाच्या व्यक्तीची चौथ्यांदा लग्नगाठ बांधली. पाचव्या वेळी तिने रिचर्ड बर्टनशी लग्न केलं मात्र त्यांचाही नंतर घटस्फोट झाला
यानंतर 16 महिने वेगळे राहिल्यावर रिचर्ड आणि एलिझाबेथ पुन्हा जवळ आले आणि त्यांनी सहाव्यांदा लग्न केलं मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि सातव्यांदा तिने जॉन वॉर्नर सोबत लग्नगाठ बांधली. पुन्हा वाद, पुन्हा घटस्फोट आणि लॅरी फोर्टेन्स्की हा तिचा आठवा नवरा बनला