हिंदू धर्मात देवांची नावे निसर्गावरून का? (फोटो सौजन्य - Social Media)
या गोष्टीचे प्रमाण स्वतः हिंदू धर्मातील देवांची नावे देतात. पूर्वीच्या काळी नोकऱ्या नव्हत्या. उत्क्रांती होत होती आणि मानव शेतीवर अवलंबून झाला होता. तेव्हा त्याचे पोट भरण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी वायू,अग्नी, माती, पाऊस, वारा याच गोष्टी कारणीभूत होत्या.
त्यामुळे मानवाने त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली. सूर्य देव (प्रकाश आणि उर्जा), वायू देव (प्राणवायू), अग्नी देव (ऊर्जा आणि शुद्धीकरण), इंद्र (पाऊस आणि शेती) अशी देवांची नावे पडली.
निसर्गाच्या या शक्तींना मानवी रूप प्राप्त झाले. पुढे, कथानकांमध्ये देवांना निसर्गाचा घटक दाखवण्याऐवजी निसर्गाचे नाव देऊन त्यांना मानवी रूपात सादर करण्यात आले.
हिंदू धर्मात कोणत्याही कार्याच्या शुभारंभावेळी स्थानिक वास्तूची पूजा केली जाते. एकंदरीत, कोकणात आजही डोंगर, नदी या सारख्या घटकांना नारळ देण्याची प्रथा आहे.
ऋग्वेदात ३३ देवता आहेत आणि त्यातील बहुतेक देवतांना निसर्गाचेच नाव प्राप्त आहे. “जीव” आणि “प्रकृती” हे वेगळे नाहीत, दोन्ही परमात्म्याचे रूप आहेत.