कोकणवासीयांच्या संस्कृतीत आणि श्रद्धेत त्यांना विशेष स्थान आहे. (फोटो सौजन्य - Social Media)
स्कंद पुराण आणि अन्य पौराणिक ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की, भगवान परशुराम यांनी आपला परशू (कुऱ्हाड) समुद्रात फेकला आणि समुद्राला मागे हटण्यास भाग पाडलं. त्यानंतर जी भूमी समुद्राच्या मागे मिळाली, तीच ‘कोकण’ आणि ‘सप्तकोकण’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
परशुरामांना ‘सप्तकोकण’चा रक्षक आणि संहारक देव मानलं जातं. महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, तसेच गोवा आणि कर्नाटकातील किनारपट्टी भागात त्यांची उपासना केली जाते.
कोकणाशिवाय केरळ, ओडिशा, गुजरात, पंजाब, आणि आसाममध्येही परशुरामाशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत आणि मंदिरं बांधलेली आहेत. केरळ तर 'परशुरामाची भूमी' म्हणूनही ओळखलं जातं.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात बुरोंडी नावाचं एक छोटे गाव आहे. येथे भगवान परशुरामांचे स्मारक आणि भव्य मंदिर उभारण्यात आले असून, दरवर्षी येथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात.
भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानले जातात. त्यांचा स्वभाव पराक्रमी आणि रागीट असला तरी ते नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारे आणि धर्माचं रक्षण करणारे होते.