फोटो सौजन्य -iStock
स्पेश मिशनदरम्यान एखाद्या अंतराळविराचा मृत्यू झाल्यास त्याचा अंत्यविधी कुठे होतो, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो. आज आपण याचं प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.
स्पेश मिशनदरम्यान आतापर्यंत 20 जणांनी त्यांचा जीव गमावला आहे. 1986 आणि 2003 मध्ये नासाच्या स्पेस शटल अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
1971 मध्ये सोयुझ 11 मोहिमेदरम्यान तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. 1967 मध्ये अपोलो 1 लाँच पॅडला लागलेल्या आगीत तीन अंतराळवीरांनी त्यांचा जीव गमावला आहे.
स्पेश मिशनदरम्यान पृथ्वीच्या कक्षेत एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास इतर क्रू काही तासांत त्याच्या मृतदेहाला कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत पाठवू शकतात.
चंद्रावर पोहोचल्यानंतर एखाद्या अंतराळविराचा मृत्यू झाल्यास क्रू काही दिवसांत मृतदेहाला पृथ्वीवर परत घेऊन येऊ शकतात.
मंगळावर एखाद्या अंतराळविराचा मृत्यू झाल्यास काही दिवसांत पृथ्वीवर येणं कठीण होऊ शकतं. अशावेळी क्रू मृतदेहाला वेगळ्या चेंबरमध्ये किंवा विशेष बॉडी बॅगमध्ये संरक्षित करेल.