फोटो सौजन्य -iStock
स्पेश मिशनदरम्यान अंतराळात एखादा अंतराळवीर हरवला तर तो पृथ्वीवर परत येऊ शकतो का? स्पेश मिशनदरम्यान अंतराळवीराला काही अडचणी आल्या, तो पृथ्वीवर परतू शकला नाही तर तो किती दिवस जिवंत राहू शकतो? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो.
जर एखादा अंतराळवीर अंतराळात हरवला आणि परत पृथ्वीवर जाण्याचा मार्ग नसेल तर त्या अंतराळवीराचा तिथेच मृत्यू होतो. ऑक्सिजन किंवा हायपोक्सियाच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो.
अंतराळात परिधान केलेले स्पेससूट, अंतराळवीरावर दबाव राखतात आणि अंतराळवीराला ऑक्सिजन आणि आवश्यक तापमान प्रदान करतात.
तज्ज्ञांच्या मते, स्पेससूटशिवाय अंतराळात अवघ्या ५० सेकंदात माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे अंतराळवीरासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेससूट.
शास्त्रज्ञही अंतराळ मोहिमा 100 टक्के सुरक्षित मानत नाहीत. अशा परिस्थितीत जर एखादा अंतराळ प्रवासी तिथे अडकला तर त्याच्यासाठी स्पेस सूट असणे अत्यंत आवश्यक आहे.
अंतराळात एकतर प्रचंड उष्णता असेल किंवा प्रचंड थंडी असेल, ज्याचा थेट परिणाम अंतराळवीरावर होईल आणि थोड्याच वेळात त्याचा मृत्यू होऊ शकतो.