फोटो सौजन्य -iStock
मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणारे जगभरातील लॅपटॉप आणि संगणक काल 19 जुलै रोजी ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले होतो. याचा परिणाम बँका आणि विमानसेवेवर देखील झाला. इंडिगो एअरलाइन्सची सुमारे 200 उड्डाणे रद्द करण्यात आली. पण जर अशाच प्रकारे जगातील इतर मोठ्या कंपन्या बंद पडल्या तर?
हल्ली कॅश बाळगण्यापेक्षा लोकं ऑनलाइन पेमेंट करणं अधिक सोयीस्कर समजतात. व्हिसा पेमेंटच्या जगात पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर मास्टरकार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. आजकाल दुकानांपासून ते ऑनलाइन खरेदीपर्यंत पेमेंटसाठी सर्वत्र मास्टरकार्ड आणि व्हिसा वापरले जाते.
मास्टरकार्ड आणि व्हिसा बंद पडले तर काय होईल. याचा सर्वात मोठा परिणाम बँकांवर होईल. आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होईल. यानंतर पेटीएम, फोन पे, गुगल पे या डिजिटल पेमेंट वॉलेटचा वापरही वाढू शकतो.
आपण आपल्या छोट्या छोट्या कामांसाठी ज्या गुगलवर अवलंबून असतो तोच बंद झाला तर इंटरनेटवर सर्वात मोठा परिणाम होईल. गुगल बंद होऊ शकतो, यावर कोणाचाही विश्वास बसणं कठीण आहे. 2013 मध्येही गुगल काही काळासाठी बंद पडले होते. त्यावेळी, काही मिनिटांतच 40% इंटरनेट ट्रॅफिक कमी झाले होते.
सध्या आपण कोठेही जाण्यासाठी GPS वर खूप अवलंबून असतो. पण ते अचानक थांबले तर? सर्वात मोठा परिणाम रस्ता शोधण्यात येईल. लोकांना रस्ता शोधण्यासाठी पुन्हा कागदी नकाशे आणि कंपास वापरावे लागतील. बस, ट्रेन, टॅक्सी या वाहनांना अडचणी येतील.
Amazon Web Services (AWS) ही क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा देणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. Netflix, BBC आणि Baidu सारख्या मोठ्या कंपन्या देखील त्यांच्या कामासाठी AWS वापरतात. ही सेवा बंद पडल्यास या सर्व गोष्टी काम करणे बंद होतील. कोट्यवधी युजर्सना हे अॅप वापरण्यात अडचणी येतील.
मास्टरकार्ड, व्हिसा कार्ड, गुगल, मायक्रोसॉफ्ट, जीपीएस आणि AWS काही कारणास्तव अचानक ठप्प झाली तरी जग पूर्णपणे ठप्प होणार नाही, परंतु सर्वत्र समस्या नक्कीच निर्माण होतील.