Independence Day 2025: Bihar's Purnia City hoist's flag a day before Independence Day, Know the special reason behind this tradition
तर बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाशी संबंधित एक अनोखी परंपरा आहे. येथे स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी म्हणजे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री तिरंगा फडकवला जातो
यामागे एक खास कारण म्हणजे १९४७ मध्ये रात्री १२.०१ वाजता रेडिओवर भारताला स्वातंत्र्य मिळाल्याची घोषण करण्यात आली होती. तेव्हा स्वातंत्र्यसैनिक रामेश्वर प्रसाद सिंह, रामरतन साह आणि शमशुल हक यांनी तिरंगात झेंडा फडकवला होता
तेव्हापासून बिहारच्या पुर्णियामध्ये १४ ऑगस्टच्या रात्रीच झेंडा फडकवण्याची आणि मिठाई वाटण्याची परंपरा सुरु झाली होती, जी पिढ्यानुपिढ्या सुरु आहे
वाघा बॉर्डरनंतर, पूर्णिया एक असे शहर आहे जिथे १५ ऑगस्टच्या सकाळी नव्हे तर १४ ऑगस्टच्या मध्यरात्री धव्जवंदन केले जाते
यावेळी लोक उत्साहाने एकत्र येतात. संपूर्ण शहर रोषणाईने सजलेले असते. लोक एकत्र येऊन झेंडा फडकवतात, देशभक्तीपर गाणी गातात
भारताच्या स्वातंत्र्याला १९४७ ते २०२५ पर्यंत ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत.यामुळे यंदाच्या वर्षी ७९ वां स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे