विविध क्षेत्रांमधील, विविध काळातील वास्तव मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ (India Lockdown) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. दोन वर्षांपूर्वी २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीचं चित्रण ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात करण्यात आलं आहे. हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं काही कामगारांनी तर आपल्या गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला. याच लोकांची कथा या चित्रपटात दाखण्यात येणार आहे. झी-५ च्या युट्यूब चॅनलवर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ‘इंडिया लॉकडाऊन’ हा चित्रपट झी-५ (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २ डिसेंबरला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.