Janhvi Kapoor Photos
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही श्रीदेवी कपूरची आणि बोनी कपूरची लेक आहे. जरीही ती इतक्या प्रसिद्ध सेलिब्रिटींची लेक असली तरीही तिने आपल्या स्व- कतृत्वावर इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची छाप पाडली आहे. तिने आपल्या फॅशनच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहिलेल्या जान्हवीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये जान्हवीने ब्लू कलरची सिंपल साडी नेसून सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.
ओपन हेअर, लूकला साजेसा मेकअप आणि सिंपल अंदाजामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करीत आहेत. अभिनेत्री कायमच इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट शेअर करत असते.
शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने व्हाईट डायमंड ज्वेलरी कॅरी करत आपला लूक पूर्ण केलेला आहे. तिच्या लूकचे चाहते जोरदार कौतुक करीत आहे.
जान्हवीच्या फोटोंवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.